एक्स्प्लोर
Advertisement
बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते
बिग बॉसच्या घरातला कर्कश्शपणा वाढत चालल्याचा दावा अनिल थत्ते यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला.
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. पत्रकार अनिल थत्ते यांना रविवारच्या भागात बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आपण या घरातून बाहेर पडणारा पहिला आनंदी सदस्य आहोत, असं थत्ते म्हणाले.
बिग बॉसच्या घरातला कर्कश्शपणा वाढत चालल्याचा दावा अनिल थत्ते यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. 'मी मर्यादा पाळणारा माणूस आहे. गलिच्छपणा, शिवीगाळ, अंगावर धावून जाणं, मारामारी, जखमी होईपर्यंत त्रास देणं असे प्रकार घरात वाढले होते. स्पर्धक आता मला काका-काका म्हणतात, पण उद्या माझ्यासोबतही क्रूरपणे वागले आणि मला आयुष्यभराची दुखापत झाली तर? या विचाराने मी घाबरलो होतो' असं अनिल थत्ते म्हणाले.
जेव्हा टोळीयुद्ध होतं, तेव्हा तुम्ही एका गटात जाणं भाग असतं. मात्र मला कोणत्याही टोळीत जाणं सुरक्षित वाटत नव्हतं, तशी इच्छाही नव्हती. त्यामुळे मी दोन्ही गटांपासून अलिप्त होतो, तसा दोन्ही गटांच्या बाजूनेही होतो, असं थत्ते यांनी सांगितलं.
मी बिग बॉसचं पर्व जिंकणार नाही, हे मला माहित होतं. सगळ्या जवानांपुढे मी कसा जिंकणार? त्यांची लोकप्रियता मी कशी मागे टाकणार? त्यामुळे थत्तेगिरीसारखे कार्यक्रम करुन लोकांचं मन जिंकण्याचे प्रयत्न मी करत होतो, अशी कबुली अनिल थत्तेंनी दिली.
म्हणून आऊंना काऊ म्हटलं
कोणाचीही भेट घेतल्यानंतर समोरच्या माणसाविषयी आपल्या मनात पहिली प्रतिक्रिया उमटते. उषा नाडकर्णी म्हणजे आऊची 'पवित्र रिश्ता' वगैरे मालिका मी पाहिली नव्हती. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा पाहून मला वाटलं 'ही खडूस दिसत्ये म्हातारी' त्यामुळे पहिल्या आठवड्यात मी उषाताईंना नॉमिनेट केलं, असं थत्ते सांगतात.
रेशम त्या काळातली माझी आवडती नटी होती. ती आखडू आहे किंवा तिला अॅटिट्यूड आहे, असं कारण देत मी तिला नॉमिनेट केलं. मात्र त्याचा दोघींनी डूख धरला, अशी खंतही अनिल थत्ते व्यक्त करतात. मी फुत्कारणारा नाग म्हणून गेलो होतो, डंख करणारा नाही, असं सांगायलाही थत्ते विसरले नाहीत.
मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील
मेघा धाडे, आस्ताद काळे आणि राजेश श्रुंगारपुरे यापैकी एक जण जिंकेल, असा अंदाज अनिल थत्तेंनी वर्तवला आहे. राजेश हा बाहेर गेला, तेव्हाच मला आश्चर्य वाटलं. तो चाणक्य आहे, त्याला वगळून चालणार नाही, हे माहित होतं.
सई चाईल्डिश-फूलिश
सुंदर दिसणाऱ्या बाईला कोणीही मतदान करेल, असं म्हणत अनिल थत्ते यांनी सई लोकूरवर निशाणा साधला. सौंदर्य हा एकमेव प्लस पॉईंट तिच्याकडे आहे. सई चाईल्डिश फूलिश कॅटेगरीतील आहे. ती टास्क खेळताना बेभान होते, दुर्दैवाने प्रेक्षक त्याला सर्वोच्च बिंदू मानतात. विचारपूर्वक केलेली कृती आणि उत्स्फूर्तपणे केलेली विकृती यामध्ये फरक आहे. तिने जुईला लाथा मारल्या होत्या, अशा शब्दात थत्तेंनी नाराजी व्यक्त केली.
स्पर्धकांसोबत गेमपुरतं वैर होतं, बाहेर आम्ही मित्रच असू. ज्यांनी शिजवलेलं अन्न मी इतके दिवस खाल्लं, त्यांच्याशी कसलं आलं शत्रुत्व? बाहेरच्या जगात ते माझे स्पर्धक नाहीत. मी पत्रकार आहे, ते कलाकार आहेत, असं सांगताना अनिल थत्ते यांनी बिग बॉसमधील अनुभवांवर पुस्तक छापण्याचा मानसही पुन्हा बोलून दाखवला.
बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती
2021 मध्ये आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय मागे घेण्याचा आग्रह सर्वांनी केला असला, तरी आपण आपल्या निर्णयापासून मागे फिरणार नसल्याचं अनिल थत्ते यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत आरती सोलंकी, विनित बोंडे आणि अनिल थत्ते यांना बिग बॉसमधून एलिमिनेट व्हावं लागलं आहे. गेल्या आठवड्यात राजेशला बिग बॉसच्या मुख्य घरातून बाहेर काढून अज्ञातवासात पाठवण्यात आलं होतं. मात्र सोमवारच्या भागात तो पुन्हा घरात परतला. पाहा व्हिडिओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement