Bigg Boss 16 : सलमान खानची 'बिग बॉस 16'मधून एक्झिट? भाईजानची जागा करण जौहर घेणार असल्याची चर्चा
Bigg Boss 16 : सलमान खान 'बिग बॉस 16' हा बहुचर्चित कार्यक्रम मध्यावरच सोडणार असल्याचं समोर आलं आहे.
Salman Khan Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी बिग बॉस बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) होस्ट करत आहे. पण आता तो हा कार्यक्रम मध्यावरच सोडणार असल्याचं समोर आलं आहे.
सलमान खान बिग बॉस सोडणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. सलमान खानचा बिग बॉससोबतचा करार संपत आला आहे. 'बिग बॉस'च्या कार्यक्रमात वीकेंडच्या वारला सलमानला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण आता सलमानची जागा कोण घेणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
सलमान खानची जागा घेणार करण जौहर?
'बिग बॉस 16' हा सलमान खानचा वादग्रस्त कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 12 जानेवारी 2023 रोजी या कार्यक्रमाचा सलमानसोबत असलेला करार संपत आहे. त्यामुळे आता सलमान खान हा कार्यक्रम सोडणार असल्याने त्याची जागा करण जौहर घेणार असल्याचे म्हटले जात आहे. 'बिग बॉस 16'च्या आगामी भागात करण जौहर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसू शकतो.
'बिग बॉस 16' संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच निर्माते सध्या करण जौहरशी चर्चा करत आहेत. त्यामुळे आता सलमानचा करार वाढवणार की करण जौहर सूत्रसंचालन करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
'बिग बॉस 16'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी झाले?
छोटी सरदारनी फेम निमरित कौर अलुवालिया, गायक अब्दू राजिक, अंकित गुप्ता, प्रियंका चाहर चौधरी, रॅपर 'एम सी स्टॅंन', अचर्ना गौतम, अभिनेता गौतम विग, शालिन भनोट, 'इमली' फेम सुंबुल तौकीर, भोजपुरी अभिनेत्री सौंदर्या शर्मा, 'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे, सुंबुल तौकीर, 'मिस इंडिया रनर अप' मान्या सिंह, राजस्थानची प्रसिद्ध डान्सर गोरी नागोरी, टीना दत्ता, श्रीजिता डे, बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान हे स्पर्धक 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाले.
View this post on Instagram
संबंधित बातम्या