Bigg Boss 15 Winner: बिग बॉस विजेती Tejasswi Prakash वर बक्षिसांचा पाऊस; पाहा काय मिळाले
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)बिग बॉस 15 ची विजेती ठरली.
Bigg Boss 15 Winner Tejasswi Prakash : बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss 15) चा काल ग्रँड फिनाले पार पडला. प्रतीक सेहजपाल (Pratik Sehajpal) , तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) हे अंतिम फेरीमधील टॉप 3 स्पर्धक होते. या स्पर्धेची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ठरली. अनेकांना असे वाटत होते की करण कुंद्रा किंवा शमिता शेट्टी या स्पर्धेत विजयी ठरतील. पण असं झालं नाही.
40 लाख आणि ट्रॉफी
बिग बॉस 15 ची विजेती ठरलेल्या तेजस्वीला या शोमध्ये असताना नागिन 6 या कार्यक्रमाची ऑफर मिळाली. तसेच तिला बिग बॉस 15 जिंकल्यानंतर 40 लाख रूपये आणि ट्रॉफी मिळाली.
करण आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती
बिग बॉसच्या या सिझनमध्ये करण आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. करण आणि तेजस्वीच्या नात्याबद्दल काही दिवसांपूर्वी करणच्या आई- वडिलांनी प्रतिक्रिया दिली होती. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये करणच्या आईने म्हणजे सुनिता कुंद्रा यांनी सांगितले की, 'बिग बॉसमध्ये जेव्हा सलमान करणला तेजस्वी आणि त्याच्या नात्याबद्दल रागवत होता तेव्हा मला रात्रभर झोप येत नव्हती कारण त्याला टॉक्सिक बॉयफ्रेंड असं म्हणले जात होते.'
View this post on Instagram
बिग बॉससोबतच या कार्यक्रमांमुळे देखील तेजस्वी होती चर्चेत
'खतरों के खिलाडी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' आणि 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 Winner : तेजस्वी प्रकाश ठरली 'बिग बॉस 15' ची विजेती, दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा
Bigg Boss 15: तेजस्वीसोबतच्या नात्याबद्दल करणच्या आई-वडीलांची प्रतिक्रिया; म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha