एक्स्प्लोर

Amit Bhanushali : तब्बल नऊ वर्षांनंतर अभिनेता अमित भानुशालीचं मालिका विश्वात पुनरागमन; 'ठरलं तर मग' मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Amit Bhanushali : स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदारची भूमिका साकारणार आहे.

Tharla Tar Mag Marathi Serial : स्टार प्रवाहवर 5 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून रडायचं नाही तर लढायचं असं ठामपणे सांगणारी सायली लवकरच मनोरंजनाच्या प्रवाहात सामील होणार आहे. या नव्या मालिकेत सायली बरोबरच आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असणार आहे आणि ती म्हणजे अर्जुन सुभेदाराची. अभिनेता अमित भानुशाली (Amit Bhanushali) ही व्यक्तिरेखा साकारणार असून तब्बल नऊ वर्षांनंतर अमित मराठी मालिका विश्वात दमदार कमबॅक करणार आहे. 

भूमिकेविषयी सांगताना अमित भानुशाली म्हणाला...

'ठरलं तर मग' मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना अमित भानुशाली म्हणाला, ‘ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. आतापर्यंत मी रोमॅन्टिक हिरोची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळं आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा आहे. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमचे दिग्दर्शक सचिन गोखले मला हे पात्र उभं करण्यासाठी खूप मदत करत आहेत. स्टार प्रवाहसोबत मी मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केली होती. पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना प्रचंड आनंद होत आहे. आमच्या निर्मात्या म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत मी एक हिंदी मालिकेत काम केलं होतं. सुचित्रा ताई सहकलाकार म्हणून उत्तम आहेतच पण निर्माती म्हणूनही त्यांच्यासोबत काम करताना धमाल येतेय. आमच्या सेटवर खूपच खेळीमेळीचं वातावरण असतं. शूट संपल्यानंतरही घरी जायची इच्छा होत नाही. सहकलाकारांसोबत छान मैत्री झाली आहे. मुळात आमच्या सेटवर प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळेच सीन करताना मजा येते. पडद्यामागचा हा घट्ट बंध प्रेक्षकांना मालिका बघतानाही जाणवेल.

या मालिकेत अमित भानुशालीबरोबरच अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 'सायली' हे जुईच्या पात्राचं नाव आहे. आता या मालिकेत अमित आणि जुईची भूमिका नेमकी कशी दिसेल याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

World Television Day 2022 : सासू-सुनांच्या मालिका जास्त हिट का होतात? टीआरपीत नंबर 1 असलेले सतीश राजवाडे काय म्हणाले? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi on Agniveer : अग्निवीरवरून लोकसभेत गदारोळ, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaDevendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णयTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 01 जुलै 2024 : ABP MajhaAnil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Embed widget