World Television Day 2022 : सासू-सुनांच्या मालिका जास्त हिट का होतात? टीआरपीत नंबर 1 असलेले सतीश राजवाडे काय म्हणाले? जाणून घ्या...
Satish Rajwade : प्रेक्षक मालिकेत गुंतत जातात त्यामुळे ते मालिकेवर टीका करतात, असं सतीश राजवाडे म्हणाले.
Satish Rajwade On World Television Day 2022 : नाटक, सिनेमे, ओटीटी अशा कितीही गोष्टी आल्या तरी आजही प्रेक्षकांमध्ये छोट्या पडद्याची क्रेझ कायम आहे. आज 'वर्ल्ड टेलिव्हिजन डे'च्या (World Television Day 2022) निमित्ताने जाणून घ्या छोट्या पडद्यामागची गणितं.
दिग्दर्शक, अभिनेता आणि टीआरपीमध्ये ज्यांच्या मालिकांचा बोलबाला आहे असे स्टार प्रवाहाचे प्रोग्रॅंमिंग हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) म्हणाले, छोटा पडदा हे खूप प्रभावी माध्यम आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच टीव्ही पाहत असतात. छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनसोक्त मनोरंजन मिळतं".
छोट्या पडद्याकडून रसिकप्रेक्षकांची काय अपेक्षा असते?
सतीश राजवाडे म्हणाले,"मला रोज काय वेगळं बघायला मिळेल अशी रसिक प्रेक्षकांची अपेक्षा असते. मी जे बघतोय ते कुठेतरी माझ्या अवती-भोवती घडत आहे, असं प्रेक्षकांना वाटतं. ते मालिकेतील प्रत्येक पात्राची तुलना करतात".
रसिकप्रेक्षकांना जेव्हा एखादी मालिका आवडते तेव्हा ते आपल्या मनात त्या पात्राची एक गोष्ट बांधत असतात. दरम्यान मनातल्या एखाद्या कथेपेक्षा वेगळीकडे मालिकेचं कथानक वळालं तर ते मालिकेवर टीका करतात. प्रेक्षकांना मालिकेत अडकवून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. प्रेक्षक मालिकेत गुंततात त्यामुळे ते मालिकेवर टीका करतात, असे सतीश राजवाडे म्हणाले.
प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांची निर्मिती करण्याकडे कल
राजवाडे पुढे म्हणाले,"छोट्या पडद्याचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. आता प्रेक्षकांची पसंती बदलली आहे. ओटीटीमुळे ते जगभरातील गोष्टी घरबरल्या पाहू लागले आहेत. त्यामुळे लोकांना काय आवडतं, त्यांना काय बघायचं आहे या गोष्टींचा अभ्यास करून मालिकांची निर्मिती करण्यात येते. आता मालिकांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. निखळ करमणूक हवं आहे लोकांना".
छोट्या पडद्यासमोर आताच्या घडीला सगळ्यात मोठं आव्हान कोणतं? यावर भाष्य करताना सतीश राजवाडे म्हणाले,"टीव्ही हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सातत्याने आपला प्रेक्षक टिकवून ठेवणं. नव-नवीन आशयांची निर्मिती करणं. हे आताच्या घडीला सगळ्यात मोठं आव्हान आहे. प्रेक्षकांना ड्रामा आवडतो त्यामुळे सासू-सुनांच्या मालिका जास्त हिट होतात. त्यामुळे या मालिकांची निर्मिती करण्यात येते".
संबंधित बातम्या