Aai Kuthe Kay Karte : "तू माझी बायको पळवलीस आता मी तुझी..."; आशुतोष विरोधात अनिरुद्धचा नवा डाव
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आजच्या भागात अनिरुद्ध खोचकपणे आशुतोषचं अभिनंदन करताना दिसणार आहे.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेत दररोज नव-नवीन ट्वीस्ट येत आहेत. मालिकेच्या आगामी भागात अरुंधती वर्ल्ड टूरला जाताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अनिरुद्ध आशुतोषचं अभिनंदन करताना दिसणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती वर्ल्ड टूरला जाणार असल्याचं दिसून येणार आहे. आजच्या भागात घरातील मंडळी अरुंधतीला शुभेच्छा देताना तसेच तिचं कौतुक करताना दिसून येतील. केळकरांच्या घरीदेखील अरुंधतीचा उत्साह वाढवण्याचे काम सर्वजण करत आहेत. दरम्यान आशुतोष वीणाला आठवण करुन देतो की, अरुंधतीने जाण्यापूर्वी कॉन्ट्रॅक्टवर सर्वांच्या सह्या होणं आवश्यक आहे. त्यावेळी अनिरुद्ध येऊन आशुतोषचं खोचकपणे अभिनंदन करतो.
अनिरुद्ध टोमना मारतो की, आशुतोषमुळे अरुंधतीला परदेशवारीवर जायला मिळते. दरम्यान अनिरुद्धच्या उपस्थितीत वीणा तिच्या आई-वडिलांच्या कंपनाचा ताबा घेण्यासाठी कागदपत्रांवर सह्या करते. अनिरुद्धने फेरफार केलेल्या कागदपत्रांवर अरुंधती, वीणा आणि आशुतोषने सह्या केल्यामुळे अनिरुद्धला मात्र खूप आनंद होतो.
View this post on Instagram
वीणाच्या आईवडिलांच्या कंपनीत आशुतोष डिरेक्टर म्हणून काम पाहणार असतो. पण अनिरुद्ध यात बदल करत त्याचं नाव सल्लागार म्हणून ठवतो. त्यानंतर अनिरुद्ध मनातल्या मनात विचार करतो की,"आता ही कंपनी माझी अर्थात अनिरुद्ध देशमुखची होणार. तू माझी बायको पळवलीस आता मी तुझी कंपनीच काढून घेणार".
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात पुढे अरुंधती निघण्याची तयारी करत असते. एकटी परदेशात जाणार असल्याने तिला खूप भीती वाटते. पण तिला विणाची सर्वात जास्त काळजी वाटत आहे. ती वीणाला समजावते की,"अनिरुद्धपासून सावध राहा. तुझा त्यांच्यावर विश्वास असला तरी ते खूप हुशार आहेत. जे काही करशील ते डोळे उघडे ठेवून कर".
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
संंबंधित बातम्या