Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत पुन्हा लगीनघाई! अरुंधती-आशुतोष पाणीपुरी डेटवर
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' ही मालिका आता रोमॅंटिक वळणावर आली आहे.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका रोमॅंटिक वळणावर आली आहे. अरुंधती नुकतीच आशुतोषसोबत लग्नबंधनात अडकली असून आता पुन्हा एकदा मालिकेत लगीनघाई पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता अनिश आणि ईशाच्या साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष पाणीपुरी डेटवर केले आहेत.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार?
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आजच्या भागात अनिश आणि ईशाच्या साखरपुड्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे. अनिश-ईशाच्या साखरपुड्यामुळे केळकरांच्या घरी उत्साहाचं वातावरण आहे. एकीकडे लग्न केल्यानंतरचं आयुष्य कसं असतं हे आशुतोष अनिशला सांगताना दिसणार आहे. एकीकडे अनिश-ईशाच्या साखरपुड्याची गडबड सुरू असल्याने अरुंधतीची मात्र खूप दगदग होत आहे. यामुळे अनिश आशुतोषला सल्ला देतो की त्याने अरुंधतीला रोमॅंटिक डेटवर घेऊन जावं.
दुसरीकडे देशमुखांच्या घरी अभीच्या क्लिनिकबाबत चर्चा होत आहे. याचर्चेदरम्यान अभिच्या लक्षात येतं की त्याला आईला चेकअपला घेऊन जायचं आहे. त्यावर अनिरुद्ध म्हणतो की,"अभी आता तू कर काळचीच करू नको. अरुंधतीचा नवरा कायम तिच्या अवतीभोवती असतो. तो त्याची सगळी कामं सोडून तिच्या मागे असतो, तो तिला चेकअपसाठीदेखील घेऊन जाईल". अनिरुद्धच्या या बोलण्याने अनघाला मात्र राग येतो. ती म्हणते,"बाबा खूप कमी बायकांना असा नवरा मिळतो".
View this post on Instagram
लॉन्ग ड्राइव्ह, पाणीपुरी अन् रोमॅंटिक डेट
अनिशच्या सांगण्यानुसार, आशुतोष अरुंधतीला घेऊन लॉन्ग ड्राइव्हसाठी निघतो. त्यावेळी तो अरुंधतीला त्याची गाडी चालवण्यास सांगतो. तिचा आत्मविश्वासदेखील वाढवतो. आजच्या भागात अरुंधती, आशुतोष यांचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. लॉन्ग ड्राइव्ह दरम्यान अरुंधतीला पाणीपुरी खाण्याची इच्छा होते. त्यानंतर ते दोघे रस्त्यावर पाणीपुरी खातात.
'आई कुठे काय करते' टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेत मधुराणी प्रभुलकर आहे. तर आशुतोषची भूमिका ओंकार गोवर्धनने साकारली आहे. अनिरुद्धच्या भूमिकेत मिलिंद गवळी आहे. तर संजनाची भूमिका रुपाली भोसलेने साकारली आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहेत.
संबंधित बातम्या