एक्स्प्लोर

'पानी' चित्रपटाच्या मतभेदानंतर सुशांतने यशराज चित्रपटाचा करार मोडला

यश राज फिल्म्समध्ये शानू शर्माचे मोठे स्थान आहे. शानूने रणवीर सिंग, अर्जुन कपूर यासारख्या मोठ्या स्टार्स ला चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. 'पवित्र रिश्ता' आणि 'झलक दिखला जा' नंतर सुशांत छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय झाला. 'झलक दिखला जा' रियालिटी शो दरम्यान शानू शर्मा यांनी सुशांतला यशराज साठी कास्ट केले.

मुंबई : आदित्य चोपडा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात क्रीएटिव डिफरन्समुळे 'पानी' चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, ज्याबद्दल यशराज फिल्म्सवर सुशांत नाराज होता. यशराजची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबत हा खुलासा केला आहे.

शानू शर्मा यांनी पोलिसांना माहिती दिली की, 'यशराजसोबतचा तिसरा चित्रपट 'पानी' साठी सुशांत खूप उत्सुक होता. यशराज यांनाही हा चित्रपट बीग बजेट चित्रपट बनवायचा होता. यशराजने या चित्रपटाच्या पूर्वनिर्मितीसाठी 4-5 कोटी रुपये खर्च ही केले. परंतु आदित्य चोपडा आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात हा चित्रपट करण्यासाठी एकमत झाले नाही. या दोघांमध्ये चित्रपट विषय क्रीएटिव डिफरन्समुळे हा चित्रपट बनू शकला नाही. हा चित्रपट पूर्ण न झाल्यामुळे सुशांत नाराज होता आणि त्याने यशराज फिल्म्स सोडण्याचा निर्णय घेतला'.

कराराचा तिसरा चित्रपट न केल्यानंतर ही सुशांतला यशराजने जाण्याची परवानगी का दिली, असा सवाल पोलिसांनी शानू शर्माला केला असता शर्मा यांनी सांगितले की, 'सुशांतने आम्हाला यशराज सोडण्याची विनंती केली. आम्हाला (यश राज) देखील हा विषय जास्त ड्रॅग करायचा नव्हता. हा करार प्रत्येकाच्या संमतीने संपत होता, म्हणून यशराजांनी सुशांतवर तिसरा चित्रपट करण्याचा आग्रह धरला नाही आणि तो करारातून बाहेर पडला'.

परंतु पोलिस शानू शर्मा यांच्या या वक्तव्याचे अधिक बारकाईने परीक्षण करणार आहे, ज्यासाठी पोलिस शानू शर्माला चौकशीसाठी परत बोलवू शकतात. याबरोबरच या डीलमध्ये सामील असलेल्या इतर लोकांचीही स्टेटमेन्ट रेकॉर्ड केले जाणार आहे.

जेव्हा शानू शर्मा यांना विचारले गेले की सुशांतने रियाला यशराज चित्रपटही सोडण्यास सांगितले होते. सुशांत यशराजवर इतका नाराज का होता की तो यशराजबरोबर स्वत: च नव्हे तर इतरांनाही काम नाही करण्याचे सल्ले देत होता. यावर शानूने सांगितले की 'सुशांत यशराजशी नाराज नव्हता. सुशांत स्वत:च्या मर्जीनं यशराजच्या कानट्रॅक्ट मधून बाहेर पडला. यशराज आणि सुशांतमध्ये कोणते ही मतभेद, भांडण किंवा आर्थिक संबंधही राहिले नव्हते'.

यशराजसाठी सुशांतसिंह राजपूतला तिनेच कास्ट केल्याचं शानू शर्मा यांनी पोलिसांना सांगितले. शानू शर्मा यांनी पोलिसांना माहिती दिली 'पवित्र रिश्ता' आणि 'झलक दिखला जा' नंतर सुशांत छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय झाला. 'झलक दिखला जा' रियालिटी शो दरम्यान मी त्याला यशराज साठी कास्ट केले'.

शानू शुर्मा यांनी पोलिसांना सांगितले की, 'यशराज सुशांतला औरंगाजेब चित्रपटासाठी कास्ट करणार होते. या चित्रपटात सुशांतला अर्जुन कपूरच्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण यशराजने त्या चित्रपटासाठी सुशांतला पाठविलेले मेल त्याने पाहिला नाही. जेव्हा सुशांत यशराजकडे परत आला, तेव्हा तो 'काय पो चो' चित्रपट करत होता, म्हणूनच यशराज यांनी नंतर सुशांतला 'शुद्ध देसी रोमॅन्स' या चित्रपटासाठी साइन केल. सुशांतने यशराजसाठी केलेला दुसरा चित्रपट 'ब्योमकेश बक्षी' होता. तिसरा म्हणजे 150 कोटींचा बजेट चित्रपट होता ‘पानी’जो बनू शकला नाही आणि यशराजसोबत सुशांतने आपला करार संपवला.’

त्याचवेळी, पोलिसांनी जेव्हा शानूला विचारले की, यशराजबरोबर झालेल्या करारामुळे सुशांतला मोठा चित्रपट सोडावा लागला होता का? यावर शानूने सांगितले की, आपल्याकडे याबद्दल काही माहिती नाही किंवा त्याने हे कधीही ऐकले नाही.

यश राज फिल्म्समध्ये शानू शर्माचे मोठे स्थान आहे. शानूने रणवीर सिंग, अर्जुन कपूर यासारख्या मोठ्या स्टार्स ला चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या पथकाचे प्रमुख डीसीपी अभिषेक त्रिमुखे म्हणाले, 'आम्ही आतापर्यंत 27 जणांची चौकशी केली आहे, मुंबई पोलिस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत'.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित बरीच मोठी नावे असून त्यांची चौकशी केली जात आहेत.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget