सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला; समोर आलं मृत्यूचं खरं कारण
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात होते. अशातच सुशांतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांना दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला आहे. या अहवालावर पाच डॉक्टरांच्या टीमच्या स्वाक्षऱ्या आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अंतिम शवविच्छेदन अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूतच्या शरीरावर कोणत्याही संघर्षाचे किंवा जखमेच्या खुणा आढळल्या नाहित. त्याचा मृत्यू फाशी घेतल्यानंतर श्वास गुदमरल्यामुळे झाला असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. तसेच सुशांतच्या नखांमध्येही काहीच आढळलं नसल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असून त्यामध्ये कोणताही घातपात घडलेला नाही.
पाहा व्हिडीओ : सुशांतनं यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले : रिया चक्रवर्ती
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आपल्या वांद्रे येथील घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतचं पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. यादरम्यान, मुंबई पोलिसांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, सुशांतचे वडिल आणि त्याच्या बहिणी, तसेच सुशांतचे मित्र, नोकर आणि इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले होते. याव्यतिरिक्त दिग्दर्शक मुकेश छाबडा यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. सुशांतचा आगामी चित्रपट 'दिल बेचारा'चे मुकेश छाबडा हे दिग्दर्शक आहेत.
Sushant Singh Rajput Death | फिल्म इंडस्ट्रीतील तणावामुळे सुशांत लो फील करत होता, वडिलांचा जबाब
गर्लफ्रेंड रिया आणि कृति सेनन विरोधात याचिका दाखल
बिहार मुजफ्फरपूरमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात एक नवं प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेत निर्माता-दिग्दर्शन महेश भट्ट, मुकेश भट्ट, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि कृति सेनन हे सुशांतचे दोषी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दुसरीकडे, 17 जून रोजी मुजफ्फरपूरमध्ये चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा, साजिद नाडियाडवाला, संजय लीली भन्साळी, एकता कपूर, दिनेश विजया, टी-सीरीजचे भूषण कुमार आणि चित्रपट अभिनेता सलमान खान यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत आणि इतर काही लोकांची साक्षीदार म्हणून नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांवर 3 जुलै रोजी सुनावणी करण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
'मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते', रिया चक्रवर्तीचा पोलिसांना जबाब
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी