Yash : 'यशचे वडील आजही बस चालवतात'; दिग्दर्शक एसएस राजामौलींची माहिती
केजीएफ-2 (KGF-2) या चित्रपटामधील यशच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
![Yash : 'यशचे वडील आजही बस चालवतात'; दिग्दर्शक एसएस राजामौलींची माहिती ss rajamouli reveals kgf 2 actor yash father arun kumar is still a bus driver Yash : 'यशचे वडील आजही बस चालवतात'; दिग्दर्शक एसएस राजामौलींची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/816a10585929293dbebdc44bbf0c9a50_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Yash : दाभिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता यश (Yash) सध्या त्याच्या केजीएफ-2 (KGF-2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. हा भारतातील सर्वाधित कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. चित्रपटामधील यशच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
केजीएफच्या रिलीजनंतर यशची लोकप्रियता प्रचंड वाढली . यश हा एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 15 कोटी मानधन घेतो मुलगा कोट्यावधी पैसे कमवूनही, यशच्या वडिलांनी बस चालविण्याचा व्यवसाय सोडलेला नाही. अशी माहिती एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी दिली आहे. मुलाखतीमध्ये एसएस राजामौली म्हणाले, 'यशचे वडील हे बस चालक आहेत. ते आजही बस चालवतात. यशचे वडील हे खरे स्टार आहेत,असं मला वाटतं. '
यशचा जन्म कर्नाटकातील हसन जिल्ह्यात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यानं अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. यशने नंदा गोकुला नावाच्या टीव्ही सीरियलने ग्लॅमरच्या जगात पदार्पण केले. त्यानं 2016 मध्ये राधिका पंडितसोबत लग्नगाठ बांधली. यशला आयरा आणि यशर्व ही दोन मुलं आहेत. यश आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात.
यशच्या KGF Chapter 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात 250 कोटींची कमाई केली होती. यशसोबतच संजय दत्त , मालविका अविनाश,श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम अशा पाच भाषेत प्रदर्शित झाला आहे. 14 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
हेही वाचा :
- Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
- Jacqueline Fernandez : ‘फक्त IIFA पुरस्कारांत सामील होऊ द्या!’, ईडीने पासपोर्ट जप्त केल्याने जॅकलिनची कोर्टात धाव!
- Kitchen Kallakar : किचन कल्लाकारच्या किचनमध्ये पुन्हा होणार बच्चेकंपनीचा कल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)