Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून अटक; हत्येपूर्वी आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर
आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलंय.
Sidhu Moose Wala : दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्याप्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला (Sachin Bishnoi) परदेशातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलंय.
कोण आहे सचिन बिश्नोई?
सचिन बिश्नोई हा गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा मास्टरमाईंड आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सचिननं सोशल मीडियावर दावा केला होता की, त्यानं ही हत्या घडवून आणली. तसेच लॉरेन्स बिश्नोईसोबत त्याने मुसेवालावर हा हल्ला घडवून आणला. सचिन बिश्नोईचा शोध गेल्या काही दिवसांपासून पंजाब पोलीस घेत होते. सचिन आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई हे दोघे खोटे पासपोर्ट तयार करुन पदेशात गेले होते. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या मदतीनं त्या दोघांचं लोकेशन ट्रेस करण्यामध्ये पंजाब पोलिसांना यश मिळाले. सचिन हा अझरबैझानमध्ये होता. तर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचं लोकेशन हे केनियामध्ये ट्रेस झालेलं आहे. अझरबैझानमधून सचिनला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. तसेच लवकरच अनमोल बिश्नोईला भारतात आणण्याचे प्रयत्न केले जातील.
सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधील आप सरकारनं सिद्धू मुसेवाला यांना दिलेली 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली.
संशयित मनकिरत औलखला क्लीनचीट
सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोषींचा पंजाब पोलीस अतिशय बारकाईने तपास करत आहेत. अशा स्थितीत काही मारेकरी पंजाब पोलिसांच्या हातीही लागले आहेत. त्याचवेळी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणा पंजाबी गायक मनकिरत औलखचे नाव जोडले जात होते. अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे एडीजीपी प्रमोद बन यांनी स्पष्ट केले आहे की, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मनकिरत औलखची कोणतीही भूमिका आढळून आलेली नाही, ज्या अंतर्गत त्याला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर संपूर्ण पंजाब फिल्म इंडस्ट्री हादरली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालाला वडिलांनी दिली अनोखी श्रद्धांजली; काढला खास टॅटू
- Sidhu Moose Wala Murder Case: मुसेवाला यांच्या हत्येनंतर शूटर्सनी हवेत फिरवली पिस्तूल, व्हिडीओ आला समोर