Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालाला वडिलांनी दिली अनोखी श्रद्धांजली; काढला खास टॅटू
Sidhu Moose Wala : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवालाचा मोठा चाहतावर्ग आहे. आता त्याच्या वडिलांनी खास टॅटू काढला आहे.
Sidhu Moose Wala : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन महिने झाले असले तरी आजही सिद्धू मूसेवालाचे चाहते त्यांच्या आठवणीत रमतात. नुकतीच सिद्धू मूसेवालाला वडिलांनी अनोखी श्रद्धांजली दिली आहे.
वडिलांनी काढला खास टॅटू
सिद्धू मूसेवाला यांनी एका व्हिडीओत म्हटलं होतं की, मी जगाचा निरोप घेतल्यानंतर लोक माझ्या नावाचा टॅटू काढतील. सिद्धू मूसेवालाचा मोठा चाहतावर्ग आहे. सिद्धूचे वडील त्याचे सर्वात मोठे चाहते आहेत. त्यामुळे वडिलांनी सिद्धूला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. बलकौर सिंह सिद्धू हे सिद्धू मूसेवालाचे वडील आहेत. त्यांनी सिद्धूचा टॅटू हातावर काढला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी सिद्धूचा टॅटू काढला आहे. टॅटूमध्ये सिद्धूच्या चेहऱ्यासोबत बंदूकदेखील दिसून येत आहे. सिद्धूचे सोशल मीडिया अकाऊंट त्याचे वडील चालवतात. सिद्धूच्या चाहत्यांनी सिद्धूच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत काहीतरी पोस्ट करण्याची मागणी वडिलांना केली आहे.
दर 5 ते 6 महिन्यांनी एक गाणे रिलीज होणार!
सिद्धू मुसेवाला यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, ते दर 5-6 महिन्यांनी सिद्धूचे एक गाणे रिलीज करतील, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील 5-7 वर्षे रिलीज होत राहतील आणि ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
संबंधित बातम्या