एक्स्प्लोर

Shyamchi Aai : पन्हाळ्यामध्ये 'श्यामची आई' चित्रपटाचं शूटिंग सुरु; माजी खासदार धनंजय महाडीक उपस्थित

सध्या या चित्रपटाचं शूटिंग पन्हाळा (Panhala ) येथे सुरू करण्यात आलं आहे.

Shyamchi Aai : 'श्यामची आई' (Shyamchi Aai) हा मराठी मनाचा एक हळवा कोपरा मानला जातो. साने गुरुजींनी आपल्या अंत:करणात वसलेली 'आई' कागदावर उतरवली. आज इतकी वर्षे होऊनही या आईची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता सिनेमाच्या रूपातून 'श्यामची आई' प्रेक्षकांना भेटणार असल्याचं सर्वांनाच माहित आहे. घोषणेपासूनच लाइमलाईटमध्ये आलेल्या या चित्रपटाचे शूटिंग सध्या वेगात सुरू आहे. कोकणातील पावसमध्ये पहिलं शेड्यूल यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक सुजय डहाके आणि त्याची टीम पन्हाळा मुक्कामी पोहोचली आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग पन्हाळा येथे सुरू करण्यात आलं आहे.

अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव 'श्यामची आई'ची निर्मिती करत आहेत. माजी खासदार धनंजय महाडीक यांनी क्लॅप दिल्यानंतर 'श्यामची आई'च्या पन्हाळ्यातील शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला. 'श्यामची आई'सारखे चित्रपट बनणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं प्रतिपादन करत धनंजय महाडीक म्हणाले की, कला, क्रिडा आणि शिक्षणाचा खूप मोठा वारसा कोल्हापूरला लाभला आहे. भालजी पेंढारकरांमुळं कोल्हापूरमध्ये चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचं आपणा सर्वांना माहित आहे. त्यामुळं कोल्हापूरमधील बरीच रत्नं संगीत-कला क्षेत्रात चमकली आहेत. यामुळं कोल्हापूरचं चित्रपटांवर विशेष प्रेम आहे. इथं बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांचं शूटिंग कोल्हापूरसह पन्हाळगडावर झालेलं आहे. पन्हाळगड आणि पावनखिंड ही प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशाच पन्हाळगडावर 'श्यामची आई'च्या दुसऱ्या शूटिंग शेड्यूलचा शुभारंभ होत असल्यानं मी मनापासून या चित्रपटाला अमृता राव, सुजय डहाके आणि त्यांच्या संपूर्ण टिमला शुभेच्छा देतो. शूटिंगसाठी हि वास्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल भोसले सरकार यांचे आभार मानतो. या चित्रपटाचा प्रीमियरही कोल्हापूरात करावा अशी विनंती करतो. या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

आजवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले चित्रपट बनवणारा सुजय डहाके या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. पन्हाळ्यातील एका शाळेत सध्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. आजच्या रंगीबेरंगी युगातील हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असल्यानं रसिकांना जुन्या काळात घेऊन जाणार आहे. सुजय या चित्रपटात कोकणातील कलाकारांसोबतच पन्हाळा-कोल्हापूरमधील ६०-७० कलाकारांच्या साथीनं श्याम आणि त्याच्या आईच्या मायाळू नात्याची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोकणामधील बऱ्याच नयनरम्य ठिकाणांवर शूट केल्यानंतर पन्हाळ्यामध्ये चित्रपटातील महत्त्वाच्या भागाचं चित्रीकरण सुरू आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray : भारत De-Modi-Nation होणार,  उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी ABP MajhaGhatkopar Bhavesh Bhinde Arrested : घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटकPalghar Rain Destruction: छप्पर उडालं,लेकरं उघड्यावर पडली.. अवकाळी पावसात संसार वाहून गेलाYavatmal Doctor Beats Woman : डोळ्यासमोर लेकचा तफडून मृत्यू, डाक्टराने आईच्या खानाखाली मारली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ
आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ; न्यायालयाकडून मिळाला न्याय
Embed widget