Sharad Ponkshe Support Mahesh Kothare: 'भाजपशिवाय देशाला पर्याय नाही... द्या किती शिव्या द्यायच्यात त्या'; शरद पोंक्षेंचं स्पष्ट वक्तव्य, महेश कोठारेंना ट्रोल करणाऱ्यांना थेट आव्हान
Sharad Ponkshe Support Mahesh Kothare: मराठी अभिनेते शरद पोंक्षेही महेश कोठारेंच्या बाजूनं बोलले आहेत. तसेच, त्यांनी महेश कोठारेंवर टीका करणाऱ्यांना थेट आव्हानंही केलं आहे.

Sharad Ponkshe Support Mahesh Kothare: मराठी सिनेसृष्टीतले (Marathi Industry) प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) सध्या चर्चेत आहेत. काहीजण त्यांची बाजू घेत आहेत, तर काहीजण त्यांच्या विरोधात पोस्ट टाकत आहेत. नुकताच दिवाळीनिमित्त भारतीय जनता पार्टीनं (BJP) एक कार्यक्रम आयोजित केलेला, त्यात महेश कोठारे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मी मोदी भक्त असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचंच कमळ फुलणार असल्याचं वक्तव्य केलेलं. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut), किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यासह अनेकांनी महेश कोठारेंवर टीकास्त्र डागलं आणि आरोपही केले. अशातच मराठी अभिनेत्री मेघा धाडेनं (Marathi Actress Megha Dhade) त्यांची बाजू घेतली आणि त्यांसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टही केली. अशातच आता मराठी अभिनेते शरद पोंक्षेही (Marathi Actor Sharad Ponkshe) महेश कोठारेंच्या बाजूनं बोलले आहेत. तसेच, त्यांनी महेश कोठारेंवर टीका करणाऱ्यांना थेट आव्हानंही केलं आहे.
View this post on Instagram
मराठी अभिनेत्री मेघा धाडे पोस्टमध्ये काय म्हणाली?
मेघा धाडे सोशल मीडियावर पोस्ट करुन म्हणाली की, "अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं उद्धव सेना जॉइन केली होती, तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्यानं तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता! सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरनं तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती, तरी कोणी आक्षेप घेतला नाही! परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की, उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली!"
"हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवास. करतोय जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे.", असं मेघा धाडे म्हणाली आहे.

शरद पोंक्षे काय म्हणाले?
मराठी अभिनेत्री मेघा धाडेच्या पोस्टवर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी कमेंट केली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी कमेंटद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे. शरद पोंक्षे म्हणाले की, "मीही मोदींचं कौतुक करतो, अमित शहांचं कौतुक करतो, जे जे चांगलं आहे, त्यांचं कौतुक करतो; सद्य परिस्थितीत भाजपशिवाय देशाला पर्याय नाही, असं माझं मत मी मांडलं. द्या किती शिव्या द्यायच्यात त्या..."
शरद पोंक्षेंच्या कमेंटवर मेघा धाडेनं रिप्लाय केला आहे. तिनं म्हटलंय की, "मुळात आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक करण्यासाठी शिव्या खाव्या लागणं हे किती दुर्दैवी आहे... लोकांचं अज्ञान दुसरं काही नाही..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























