एक्स्प्लोर

Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी

Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील केंजळ हे गाव रंगीबेरंगी करण्यात आले आहे.

Satarcha Salman Movie :  'सातारचा सलमान' (Satarcha Salman) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील (Satara) केंजळ हे गाव खास रंगीबेरंगी करण्यात आले आहे. 'सातारचा सलमान' या सिनेमाचं शूटिंग साताऱ्यातील केंजळ गावात झालं आहे. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' हा सिनेमा आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच हेमंत ढोमेने या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या 'सातारचा सलमान' या गाण्याने प्रत्येकालाच ठेका धरायला लावले. एकंदरच रंगीबेरंगी वातावरण, आजूबाजूला पारंपरिक पोशाखात जल्लोषात नाचणारे गावकरी, सुयोगचा उत्स्फूर्त नाच आणि त्याला इतर कलाकारांनी दिलेली उत्तम साथ एकंदरच सगळं मस्त जुळून आले आहे.

'सातारचा सलमान' सिनेमासाठी गावातील घरं रंगीबेरंगी का झाली? 

'सातारचा सलमान' हे गाणं चित्रीत करण्यापूर्वी हेमंतच्या (Hemant Dhome) डोक्यात काही कल्पना होत्या. मुळात हे गाणं खूपच उत्स्फूर्त, जल्लोषमय असल्याने चित्रीकरणाचा परिसरही त्याला तसाच कलरफूल, उत्साहवर्धक हवा होता. या सिनेमाचे बरेच चित्रीकरण हे साताऱ्यातील गावांमध्ये झाल्याने तिथे रंगीबेरंगी घरे दिसण्याची तशी शक्यताच नव्हती. अखेर हेमंतने गावाच्या चौकातल्या सगळ्या घरांना वेगवेगळे रंग देण्याचे ठरवले आणि गंमत म्हणजे हेमंतच्या या निर्णयावर गावकऱ्यांनीही संमती दर्शवली. 

हेमंत म्हणाला की, "गावकरी अगदी येऊन येऊन सांगत होते, माझ्या घराला हिरवा रंग द्या, पिवळा रंग द्या. अखेर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार घरांना रंग दिला आणि हेमंतला जे अपेक्षित होते, ते गाण्यात उतरले. आजही साताऱ्यातील केंजळ या गावात गेल्यावर ही रंगीबेरंगी घरे पाहायला मिळतात." 

'सातारचा सलमान' 3 मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

'सातारचा सलमान' हा सिनेमा येत्या 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असल्याने या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hemant Dhome | पिंपरखेडचा हेमंत ढोमे (@hemantdhome21)

संबंधित बातम्या

Satarcha Salman : स्वप्नांच्या दुनियेतली भन्नाट माणसं येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'सातारचा सलमान'चा ट्रेलर आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Madhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special ReportBhau Torsekar Majha Katta | भाजप हरेल तेव्हा मोदींचं काय? मोदी भक्त भाऊ तोरसेकर 'माझा कट्टा'वरJob Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget