अभिनेत्रीसोबतचं नातं तुटलं, वन नाईट स्टँडनंतर ठरलं लग्न; अनिल कपूरच्या भावाची अनोखी प्रेमकहाणी
Sanjay Kapoor and Tabu Were in a Relationship: संजय कपूरची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल. लग्नाआधी तब्बूसोबत रिलेशनशिप असल्याची कबुली.

Sanjay Kapoor and Tabu Were in a Relationship: बॉलिवूडमधील कलाकार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी चित्रपट तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात येतात. तर, कधी कलाकारांच्या रिलेशनशिपची प्रचंड चर्चा होते. अनेक अभिनेत्यांनी आतापर्यंत पत्नीला फसवले असल्याची खुलेआम कबुली दिली. अलिकडेच अभिनेता संजय कपूर चर्चेत आला आहे. अभिनेत्यानं लग्नापूर्वी तब्बूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. त्यांची जुनी मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्यांनी तब्बूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. दरम्यान, दोघांच्या रिलेशशिपला नेमकं कशामुळे ब्रेक लागला? पाहुयात.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत संजय कपूर म्हणाला, "प्रेम या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तब्बूसोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नाते तुटले". संजय कपूरने जुन्या मुलाखतीत तब्बूला डेट करत असल्याचं कबूल केलं. "सुरूवातीला मी तब्बूला डेट करत होतो. पण चित्रपटाच्या अखेरीस आम्ही एकमेकांशी बोलणे बंद केले होते. प्रेम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका चालला नाही. चार आठवड्यात माधुरी दिक्षितचा राजा हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला", असं संजय कपूर म्हणाले. दरम्यान, तब्बूने दुसऱ्या एका मुलाखतीत खुलासा केला की, संजय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना, ते महीपलाही डेट करत होते, असा खुलासा तिने केला. याच कारणामुळे त्यांचे नाते संपुष्टात आले.
तब्बू आणि संजय कपूरच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली होती. संजय कपूरने 1997 मध्ये महीप कपूरशी लग्न केले होते. लग्नानंतर दोघांना दोन मुले झाली. महीपने एका जुन्या मुलाखतीत संजयसोबतची तिची प्रेमकहाणीही सांगितली. महीप म्हणाली, "आमची प्रेमकहाणी खूप साधी होती. मी एका पुरूषासोबत वन नाईट स्टँड केले होते. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की एक दिवस माझं त्याच्यासोबत लग्न होईल", असं महीप म्हणाली. "मी त्याच्या पार्टीला न बोलवता गेले होते. तिथेच मी त्याला भेटले होते. मी पूर्णपणे दारू पिऊन होते. मी तेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भेटले. मी दारू पिऊन होते, तरीही त्यांनी मला स्वीकारले", असं महीप म्हणाली.
महीप कपूरशी लग्न करण्यापूर्वी संजय कपूर तब्बूसोबत रिलेशनशिपमध्ये होते. प्रेम चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचं जुळलं. दरम्यान, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच दोघांचा ब्रेकअप झाला. फिल्म रिलीज होण्यापूर्वी दोघांमधले बोलणे बिघडले होते. यामुळे कपलने दोघांशी बोलणे बंद केले होते.
























