Saif Ali Khan Attack Case: सैफला भोसकणाऱ्याच्या हाताला चोरीचा चळ; कामाच्या ठिकाणी ग्राहकाची अंगठी केलेली लंपास, कामावरुन झालेली हकालपट्टी
Saif Ali Khan Injured: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरानं वरळीतील कॅफेत कामाला असतानाही चोरी केली होती. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणात सहभागी असल्यावरुन कामावरुन काढण्यात आलं होतं.
Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजादच्या (Mohammad Shahzad) मुसक्या पोलिसांनी (Mumbai Police) आवळल्या आहेत. आता आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आरोपीच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी वरळीतल्या सिल्कवर्क कॅफेमध्ये कामाला होता. त्यावेळी त्यानं चोरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं, अशी माहिती मिळत आहे.
सैफ अली खानवर (Saif Ali Khan Injured) हल्ला करणाऱ्या हल्लेखोरानं वरळीतील पबमध्ये कामाला असतानाही एकदा चोरीचा प्रयत्न केला होता. वरळीतील कॅफेत एका ग्राहकाची अंगठी चोरल्याप्रकरणी त्याला ऑगस्टमध्ये कामावरून कमी करण्यात आलं होतं, अशी माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. अशातच आता पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवत त्या कॅफेतील काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसेच, त्यांचे मोबाईलही पोलिसांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आरोपी वरळीत राहत असल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळे पोलीस सखोल तपास करत आहेत.
वरळीत एका ग्राहकाची अंगठी चोरण्याचा आरोपीचा प्रयत्न
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरानं वरळीतील कॅफेत कामाला असतानाही चोरी केली होती. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणात सहभागी असल्यावरुन कामावरुन काढण्यात आलं होतं. वरळीतील कॅफेत एका ग्राहकाची अंगठी चोरी प्रकरणात त्याचाही सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कामावरून कमी करण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, शरीफुल थोडा विक्षिप्त होता, बोलायला चांगला होता. या कॅफेत तो हाऊस किपिंगमध्ये काम करायचा. त्याच्या कामाबाबतही काहीच प्रश्न नव्हता. तो त्याचं काम चोख करायचा. पण अचानक त्यानं चोरीचा प्रयत्न केला. ऑगस्ट 2024 ला पबमध्ये आलेल्या एका ग्राहकाची हिऱ्याची अंगठी चोरीला गेली होती. त्या ग्राहकानं पबच्या व्यवस्थापनाला माहिती देऊन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तातडीनं झाडाझडती घेतली गेली, सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपीनंच अंगठी चोरल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर तत्काळ त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. पोलिसांनी रविवारी वरळीत शरीफुल उर्फ दास काम करत असलेल्या ठिकाणच्या जुन्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून आरोपी आधीही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
पाहा व्हिडीओ : Saif Attacker Stolen : सैफच्या हल्लेखोराने कॅफे, पबमध्येही चोरी केली, नोकरी गमावली
महत्त्वाच्या इतर बातम्या :