एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...; आरोपीनं पोलिसांना 'मास्टरप्लान' सांगितला

Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती. पण, त्यापैकी सैफचं घर सोयीस्कर वाटल्यानं त्यानं सैफच्या घरात शिरण्याचा निर्णय घेतला.

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) तीन दिवसांपूर्वी त्याच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला.  घरात घुसण्याआधी आरोपीनं सैफच्या घराची रेकी केली असल्याचं बोललं जात आहे. तब्बल तीन दिवसांनी पोलिसांनी सैफच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता आरोपीच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

सुत्रांच्या वतीनं समोर येत असलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्य घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजादनं अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती. वांद्र्यात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची घरं हेरुन आरोपीनं रेकी केल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक घरांची रेकी केली असल्याची माहिती मिळत आहे. वांद्र्यातून एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालककडून या सेलिब्रेटिंच्या घराची माहिती आरोपीनं मिळवली होती. त्यापैकी सैफ अली खानचं घर आतमध्ये घुसण्यासाठी अधिक सोयीचं वाटल्यानं आरोपीनं ते घर निवडलं. 

आरोपी सैफचा मुलगा जहांगीरला (जेह) ओलीस ठेवून पैशांची मागणी करणार होता. पण, हे करत असताना घरातले सगळेच जागे झाल्यानं आरोपी घाबरला आणि सुटकेसाठी बिथरलेल्या आरोपीनं अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली. याचवेळी सैफ अली खानवर एकूण 6 वार आरोपीनं केले आणि तिथून फरार झाला. आरोपीला बांगलादेशात पुन्हा जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता, त्यासाठीच पैश्यांची व्यवस्था आरोपी करत होता, अशीही माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे. 

सैफवर हल्ला केल्यानंतर ढाराढूर झोपलेला आरोपी 

सैफवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीनं इमारतीतून पळ काढला खरा, पण त्यानंतर तो बेदरकारपणे फिरत होता. हल्ला केल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. त्यानंतर निवांतपणे झोपला. उठल्यानंतर त्यानं सर्वात आधी कपडे बदलले आणि तिथून चालत वांद्रे स्थानक गाठलं. त्यानंतर तिथून दादरला आला, दादरहून वरळीला आला. वरळीत यापूर्वी काम केलेल्या कॅफेमध्ये रात्रभर थांबला. आरोपीला बांगलादेशला पळून जाण्यासाठी बनावट पासपोर्टची गरज होती. त्यामुळे त्याला पैसे लागणार होते. म्हणून तो कामाच्या शोधात होता. कामासंदर्भात एका व्यक्तीला भेटून आरोपी तिथून ठाण्याला निघून गेला. 

पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Case Update:सैफच्या हल्लेखोराच्या जबाबानंतर पोलीस गुन्ह्याचं नाट्यरुपांतर करणार

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget