एक्स्प्लोर

Runway 34 Box Office: अजयच्या ‘रनवे 34’चं बॉक्स ऑफिसवर ‘क्रॅश लँडिंग’, कमाईच्या बाबतीत चित्रपट पडला मागे!

Runway 34 Box Office: अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांचा ‘रनवे 34’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष जादू दाखवू शकलेला नाही.

Runway 34 Box Office: अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याचा ‘Runway 34’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. पण, बॉक्स ऑफिस ट्रॅकवर त्याचा प्रवास तितकासा सोपा दिसत नाहीय. ‘रनवे 34’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष जादू दाखवू शकलेला नाही. पहिल्या दिवशी अजय देवगण आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या या चित्रपटाने 3.50 कोटींची ओपनिंग केली होती. ‘रनवे 34’चे हे कलेक्शन टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) ‘हिरोपंती 2’पेक्षा (Heropanti 2) खूपच कमी होते. आता दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने संथगतीने कमाई सुरु ठेवली आहे.

या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 5.25 कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत ‘रनवे 2’ने दोन्ही दिवसांत मिळून एकूण 8.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘रनवे 34’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी किंचित वाढ दिसली, तरी हा आकडा खूप कमी आहे. विकेंड आणि सुट्टीचा दिवस असला, तरी प्रेक्षकवर्ग या चित्रपटाकडे वळताना दिसलेला नाही.

‘हिरोपंती 2’चेही आकडे घसरले

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याचा ‘हिरोपंती 2’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 7 कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या आकड्यांमध्येही घसरण झाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने केवळ 5 कोटींचा टप्पा गाठला आहे. तरीही या चित्रपटांची तुलना केल्यास कमाईच्या बाबतीत टायगरचा ‘हिरोपंती 2’, अजय देवगणच्या ‘रनवे 34’च्या पुढे आहे.  

‘रनवे 34’ हा अजय देवगण दिग्दर्शित आणि निर्मित चित्रपट आहे. या चित्रपटात अजयने स्वतःही अभिनय केला आहे. अजयसोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंह, बोमन इराणी हे नावाजलेले कलाकार झळकले आहेत. ‘रनवे 34’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित थ्रिलर चित्रपट आहे.

हेही वाचा :

Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

Satyavan Savitri : गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची! नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Payal Rohtagi : ‘चेहरा सुंदर दिसण्यासाठी सगळेच उपाय सांगतात, पण...’, पायल रोहतगीने व्यक्त केलं ‘त्या’ गोष्टीचं दुःख!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget