एक्स्प्लोर

नराधमांमुळे होळी सणाला गालबोट; व्हिडिओ पाहून संताप, अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, या तरुणांना अटक करा

Harsh reaction to alleged animal abuse during Holi: रंगपंचमीदरम्यान हरियाणात भयंकर घडलं. गायीला दारू पाजण्यात आली. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने संताप व्यक्त केला.

Tejaswini Pandit demands strict action over viral clip: आज देशभरात रंगपंचमी अगदी उत्साहात साजरी करण्यात आली. रंगांची उधळण करत अनेकांनी पुरणपोळीवर ताव मारला. सोशल मीडियावर धुळवडीचे अनेक व्हिडिओ व्हायरल  होत आहे. मात्र, एका व्हिडिओमुळे तुमची तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते.  या व्हिडिओवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. उत्साहाला गालबोट लावणारा हा धक्कादायक व्हिडिओ हरियाणा येथील असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओत काही नराधमांनी मजा मस्तीच्या नावाखाली चक्क गायीला दारू पाजली आहे.  हा व्हिडिओ पाहून नक्कीच कुणाचंही रक्त सळसळेल. या व्हिडिओवर अनेकांनी रोष व्यक्त केला. तसेच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हा व्हिडिओ पाहून चांगलीच संतापली आहे. तिनं नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. 

सण होळीचा, पण एका व्हिडिओमुळे  या सणाला गालबोट लागला असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ हरियाणातील एका भागातील आहे.  या भागात होळीचं सेलिब्रिशन सुरु असतं.  पण काही नराधमांनी मिळून भयंकर कृत्य केलं. काही लोकांनी मस्तीच्या नावाखाली गायीला जबरदस्तीनं दारू पाजली.  हे नराधम इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी गायीला गाडी  ओढायला लावली. या गाडीवर काही लोक बसून मजा घेत होते. अक्षरश: धिंगाणा घालत होते.   

ही घृणास्पद वागणूक पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला. तेजस्विनी पंडित हिनं देखील रोष व्यक्त केला.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ज़िन्दगी गुलज़ार है ! (@zindagi.gulzar.h)

तेजस्विनी पंडित कायम अन्यायाविरोधात आवाज उठवते. ती आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.  तिनं हा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. तसेच संताप व्यक्त करत नराधमांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.  तिनं व्हिडिओ  शेअर करत म्हटलं की, 'व्हिडिओत उपस्थित सर्वांना तातडीने अटक करा;  अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळेच  सणाचं पावित्र्य धोक्यात येतं', असं तेजस्विनी म्हणाली. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget