(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Payal Rohtagi : ‘चेहरा सुंदर दिसण्यासाठी सगळेच उपाय सांगतात, पण...’, पायल रोहतगीने व्यक्त केलं ‘त्या’ गोष्टीचं दुःख!
Lock Upp : पायलने लॉक अपमध्ये आयुष्यातील सर्वात मोठे गुपित उघड करून, अनेक महिलांना हिंमत दिल्याबद्दल कंगनाने तिचे कौतुकही केले.
Lock Upp : अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohtagi) ही लॉकअपमधील सर्वात चर्चेत असलेल्या आणि मजबूत खेळाडूंपैकी एक आहे. पायल शोच्या सुरुवातीपासूनच तिच्या वागण्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच पायलने या शोमध्ये असेच एक रहस्य उघड केले, ज्याने सर्वांचे डोळे पाणावले होते. पायलने लॉक अपमध्ये हे गुपित उघड करून, अनेक महिलांना हिंमत दिल्याबद्दल कंगनाने तिचे कौतुकही केले. आपण खूप प्रयत्नानंतरही आई बनू शकत नसल्याचे तिने या शोमध्ये सांगितले.
आता पायलने पुन्हा एकदा कॅमेरासमोर आपले दुःख व्यक्त केले आहे. पायल भावूक होऊन म्हणाली की, ‘मी आयुष्यात काहीतरी करण्यासाठी अहमदाबादहून मुंबईला आले होते. अगदी लहानपणापासून मी माझ्या कुटुंबासाठी कमावते आहे. या प्रवासात माझा चेहरा सुंदर दिसावा यासाठी डॉक्टरांनी अनेक सल्ले दिले, पण आई होण्यासाठी मला एग्स फ्रीज करण्याचा सल्ला कोणीही दिला नाही. दरम्यान रिलेशनशीपच्या टेन्शनमुळे खूप दारूही प्यायले होते. आत्महत्या करावी असे देखील वाटले होते’.
पायलचा स्त्रीयांना सल्ला
पायल पुढे म्हणाली की, ‘त्यावेळी मला हे समजले नव्हते की, करिअरच्या नादात मला इतका उशीर होईल आणि मी आई होऊ शकणार नाही. मला वाटते की, प्रत्येक स्त्रीने स्वतंत्र आणि स्थिर झाल्यानंतर आपली एग्स फ्रीज प्रक्रिया करून घेतली पाहिजे. जेव्हा आपण आरामाच्या टप्प्यावर पोहोचतो, तेव्हा आपले शरीर आपल्याला या गोष्टीत साथ देत नाही. महिला म्हणून आपण स्वतःची अधिक काळजी घेतली पाहिजे. निदान एखाद्या दात्याच्या मदतीने तरी आपण आई होऊ शकतो’.
पायलने व्यक्त केलं आई न होण्याचं दुःख!
पायल रोहतगीने 'लॉक अप' शोमध्ये सांगितले की, ती गेल्या अनेक वर्षांपासून आई बनण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रत्येक वेळी ती अपयशी ठरली. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये पायल रोहतगी कॅमेऱ्यासमोर आली होती आणि म्हणाली की, 'मला काही बोलायचे आहे. मला खूप वाटतं की, मलाही मुलं असावीत, पण मी आई होऊ शकत नाहीय.’ आपलं दुःख व्यक्त करताना पायलच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ती कॅमेऱ्यासमोर रडायला लागली. रडतच पायल म्हणाली की, 'आम्ही मागील चार-पाच वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी मी IVF देखील केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि लोक मला आता यावरून ट्रोल देखील करू लागले आहेत.’
हेही वाचा :