(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
Dharmendra : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dharmendra : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली
होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत असून, आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो. धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल सध्या धर्मेंद्रसोबत रुग्णालयात आहे.
View this post on Instagram
धर्मेंद्र यांचे वय 86 असूनदेखील ते सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. धर्मेंद्र लवकरच 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'अपने' या सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. या सिनेमात धर्मेंद्रसोबत त्यांचा नातू करण देओल तसेच सनी देओलदेखील दिसणार आहे. धर्मेंद्र यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
संबंधित बातम्या