Rashmika Mandana : नॅशनल क्रश रश्मिका मंदना सारखा फिटनेस हवाय? फॉलो करा हा वर्क आऊट प्लॅन अन् डाएट
Rashmika Mandana Fitness Mantra : जाणून घेऊयात रश्मिकाच्या डाएट आणि वर्क आऊट प्लॅनबद्दल
Rashmika Mandana Fitness Mantra : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandana) ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयाने ती प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकते. रश्मिकाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रश्मिका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. रश्मिकासारखा फिटनेस हवा असेल तर तुम्ही हा वर्क आऊट प्लॅन आणि डाएट फॉलो करू शकता.
रश्मिकाचा वर्क आऊट प्लॅन
रश्मिका तिचे वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. रिपोर्टनुसार रश्मिका आठवड्यातून चार ते पाच वेळा जिममध्ये जाऊन वर्क आऊट करते. ती स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डियो, कोर आणि वेट ट्रेनिंग हे वर्क आऊटचे प्रकार करते. तसेच ती ज्या दिवशी जिममध्ये जात नाही त्या दिवशी ती पॉवर योगा,स्विमिंग, वॉक आणि किक बॉक्सिंग करते.
रश्मिकाचं डाएट
रिपोर्टनुसार रश्मिका रोज सकाळी अॅप्पल सायडर व्हिनेगर पाण्यामध्ये मिक्स करून पिते.ती भात, जंक फूड आणि तळलेले पदार्थ खात नाही.तसेच ती फळ, सूप आणि नारळ इत्यादींचा समावेश तिच्या डाएटमध्ये करते.
View this post on Instagram
2016 मध्ये रश्मिकाचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता. रश्मिकाने कन्नड सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने सलग हिट सिनेमांमध्ये काम केले. याचाच परिणाम म्हणजे रश्मिका एका चित्रपटासाठी 3-4 कोटी मानधन म्हणून घेऊ लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती सुमारे 400 दशलक्ष डॉलर आहे.
संबंधित बातम्या