Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत; आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचा भन्नाट थाट
Rashmika Mandanna Net Worth : रश्मिका मंदानाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे.
Rashmika Mandanna Total Income : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) नुकताच प्रदर्शित झालेला 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 'पुष्पा'च्या यशानंतर रश्मिकाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने हिंदी बॉक्स ऑफिसवरदेखील धुमाकूळ घातला आहे. रश्मिकाने दक्षिणेतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रश्मिका जितकी सुंदर दिसते तितकीच तिची जीवनशैलीही धक्कादायक आहे.
2016 मध्ये रश्मिकाचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता. रश्मिकाने कन्नड सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने सलग हिट सिनेमांमध्ये काम केले. याचाच परिणाम म्हणजे रश्मिका एका चित्रपटासाठी 3-4 कोटी मानधन म्हणून घेऊ लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती सुमारे 400 दशलक्ष डॉलर आहे.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका बंगळुरूमधील एका आलिशान व्हिलाची मालकही आहे. याची किंमत सुमारे 8 कोटी आहे. रश्मिकाने 2020 मध्ये हैदराबादमध्ये एक नवीन घर देखील खरेदी केले आहे. एवढेच नाही तर गोव्यातदेखील तिने घर बांधले आहे. रश्मिकाकडे अनेक आलिशान वाहनेदेखील आहेत. रश्मिकाकडे Audi Q3, Toyota Innova आणि Hyundai Creta देखील आहे.
रश्मिकाला लग्झरी बॅगचीदेखील खूप आवड आहे. रश्मिकाकडे असलेल्या हँडबॅगची किंमत 3 ते 4 लाखांपर्यंत आहे. रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लवकरच ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि अमिताभ बच्चनसोबत आगामी सिनेमात झळकणार आहे.
संबंधित बातम्या
Pushpa on OTT : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा आता ओटीटीवर झाला प्रदर्शित
Ranbir Kapoor : कतरिनावर अजूनही रणबीरची नजर? एका मुलाखती दरम्यान रणवीरने केला खुलासा
Irrfan Khan Birth Anniversary : आयुष्याच्या रंगमंचावरुन अचानक एक्झिट घेणाऱ्या इरफान खानच्या 'या' आहेत गाजलेल्या भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha