Pushpa on OTT : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा आता ओटीटीवर झाला प्रदर्शित
Pushpa on Amazon Prime Video : 'पुष्पा: द राइज' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Pushpa on OTT : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तरीदेखील सिनेमा कोट्यवधींची कमाई करतो आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर
'पुष्पा' सिनेमा आता प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
He’ll fight. He’ll run. He’ll jump. But he won’t succumb! 💥
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) January 5, 2022
Watch #PushpaOnPrime, Jan. 7
In Telugu, Tamil, Malayalam and Kannada@alluarjun #FahadhFaasil @iamRashmika@Dhananjayaka #Suneel #AjayGhosh #RaoRamesh @OG_Jagadeesh @ShatruActor @anusuyakhasba #Sritej #MimeGopi pic.twitter.com/lVxoE7DJSs
7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर लवकरच हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमाने 26 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 20 कोटी कमवले. तर तिसऱ्या आठवड्यात 25 कोटींची कमाई करत सिनेमाने तीन आठवड्यात 72 कोटींची कमाई केली.
#Pushpa juggernaut continues… #PushpaHindi emerges first choice of moviegoers, overtaking #83TheFilm and #SpiderMan on weekdays… [Week 3] Fri 3.50 cr, Sat 6.10 cr, Sun 6.25 cr, Mon 2.75 cr, Tue 2.50 cr, Wed 2.25 cr, Thu 2.05 cr. Total: ₹ 72.49 cr. #India biz. SUPER-HIT. pic.twitter.com/q92q5cfsIa
— taran adarsh (@taran_adarsh) January 7, 2022
'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.
संबंधित बातम्या
Ranbir Kapoor : कतरिनावर अजूनही रणबीरची नजर? एका मुलाखती दरम्यान रणवीरने केला खुलासा
Sonu Sood : अभिनेता सोनू सूदचा मदतीचा हात, 11 वर्षीय जान्हवीची अपंगत्वावर मात
Films Get Postponed Due To Corona : बॉलिवूडच्या पाच बिग बजेट सिनेमांना कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलल्या पुढे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha