Ranveer Singh On Rishab Shettys Character In Kantara: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'मधल्या देवीला रणवीर सिंह जाहीरपणे म्हणाला, 'भूत'; नेटकऱ्यांचा संताप, VIDEO
Ranveer Singh Mimicked Rishab Shettys Character In Kantara: ऋषभ शेट्टीच्या अभिनयानं सर्वांना थक्क केलेलं. मोठ्या पडद्यावर त्यानं जे काही साकारलं, जे एखाद्या जादूच्या प्रयोगाप्रमाणेच होतं, अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं.

Ranveer Singh Mimicked Rishab Shettys Character In Kantara: 2025 मधल्या सर्वात मोठ्या सिनेमांपैकी बोलायचं झालं तर, यादीत सर्वात टॉप सिनेमांमध्ये ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1'चा (Kantara: A Legend Chapter-1) आवर्जुन समावेश केला जाईल. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला. तसेच, या सिनेमाच्या कथेनंही सर्वांची मनं जिंकली. 'कांतारा' सिनेमाचा (Kantara Movie) हा प्रीक्वल. पौराणिक कथेवर आधारित 2022 मध्ये आलेल्या 'कांतारा'नंही (Kantara) त्यावेळी प्रेक्षकांना खिळवून ठेवलेलं. दोन्ही सिनेमांमधील ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) अभिनय तर वाखाण्याजोगा होता. ऋषभ शेट्टीच्या अभिनयानं सर्वांना थक्क केलेलं. मोठ्या पडद्यावर त्यानं जे काही साकारलं, जे एखाद्या जादूच्या प्रयोगाप्रमाणेच होतं, अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं.
'कांतारा'मध्ये दाखवलेल्या देवीला रणवीर सिंह म्हणाला, 'भूत'
ऋषभ शेट्टी आणि त्याचा 'कांतारा' सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी, त्याच्या व्हायरल होण्याचं कारण बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आहे. त्यानं ऋषभ शेट्टीच्या चित्रपटावर एक टिका केलीय. ज्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
मूळात ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' सिनेमा पौराणिक कथेवर आधारित होता. कर्नाटकातील तुळु समुदायाच्या देवांबद्दलची ही कथा. हा समाज त्यांच्या देवांचा प्रचंड आदर करतात आणि त्यांना जीवापाड जपतात. दरवर्षी, त्यांच्या गावात देवांचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रणवीर सिंहनं एका कार्यक्रमात जाहीरपणे बोलताना या देवांचा अपमान केल्याचं बोललं जात आहे. रणवीर सिंहनं चामुंडा मातेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह नुकताच तो त्याचा आगामी चित्रपट 'धुरंधर'च्या प्रमोशनसाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFA) मध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमादरम्यान, त्याला 'कांतारा'चा सर्वेसर्वा ऋषभ शेट्टी दिसला आणि त्याची प्रशंसा करण्याच्या प्रयत्नात त्यानं असं काही केलं, ज्यामुळे लोक नाराज झाले. एकंदरीतच रणवीर सिंहनं उत्साहाच्या भरता स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे.
रणवीर सिंह नेमकं म्हणाला काय?
'कांतारा'मधील रणवीर सिंहच्या अभिनयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता म्हणतो की, "मी तुझा सिनेमा थिएटरमध्ये बघितला आणि खरं सांगू तर तुझा अभिनय शानदार होता. विशेषत: जेव्हा तुझ्या अंगात फीमेल भूत येतं तो एक शॉटच भारी होता. तुम्ही कांतारा पाहिला का? तो शॉट पाहिला का...? कोणाला मला कांतारा ३ मध्ये बघायची इच्छा आहे? याला सांगा..."
#RanveerSingh literally called Chavundi Mata a GHOST 😡😡😡
— Pan India Review (@PanIndiaReview) November 29, 2025
Mimicked her in funny way 🙂↔️🙂↔️🙂↔️🙂↔️
Man is working hard to make things difficult for #Dhurandhar ‼️pic.twitter.com/HeNyi60lu7
त्यानंतर रणवीर ऋषभ शेट्टीच्या चामुंडा मातेच्या प्रवेशाचा सीन करतो. त्यानं ज्या पद्धतीनं तो सादर केला, त्यामुळे ऋषभ हसायला लागला. पण, रणवीरनं देवाचा अपमान केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरील चाहते रणवीरच्या वागण्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "त्यानं काय पाहिलंय? तो एका देवीला फिमेल भूत म्हणतोय..."
सोशल मीडियावरील चाहते रणवीरच्या वागण्यावर, विशेषतः त्याचा 'धुरंधर' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या जवळ येत असल्यानं, संतापले आहेत. त्यामुळे येत्या काळात एकंदरीत रणवीर सिंहला हे प्रकरण काहीसं जड जाणार असंच दिसतंय. त्यातच रणवीर सिंहचा आगामी सिनेमा 'धुरंधर'ची रिलीज डेटही जवळ आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























