Rang Majha Vegla : मुलींची अदलाबदल होणार, दीपिकाच्या बदल्यात कार्तिकी इनामदारांच्या घरी जाणार!
Rang Majha Vegla : दीपिका दीपाच्या घरी राहायला गेल्याने आता सौंदर्या इनामदार कार्तिकीला इनामदारांच्या घरी घेऊन जाणार आहे.
Rang Majha Vegla : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या अनेक चढ-उतार दिसत आहेत आणि यामुळेच प्रेक्षक देखील या मालिकेत गुंतून पडले आहेत. सध्या मालिकेत दीपिका घर सोडून दीपाच्या घरी जाताना दाखवली आहे. आता मालिकेत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट येणार आहे.
दीपिका दीपाच्या घरी राहायला गेल्याने आता सौंदर्या इनामदार कार्तिकीला इनामदारांच्या घरी घेऊन जाणार आहे. दीपिकाला आईची माया, तर कार्तिकीला वडिलांचं प्रेम मिळावं म्हणून सौंदर्या ही अदलाबदल करणार आहे. एकीकडे दीपिकाला सत्य कळल्यामुळे ती घर सोडून दीपाकडे राहायला आली आहे. तर, दुसरीकडे डॉक्टर कार्तिकमुळे आपल्या आईचं आयुष्य बरबाद झालं म्हणून कार्तिकीने देखील कार्तिकशी अबोला धरला आहे. या सगळ्यानंतर आता कार्तिकी इनामदारांच्या घरात राहायला जाणार का? हे मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
... म्हणून दीपिकाने सोडलं इनामदारांचं घर!
श्वेताच्या बोलण्यातून आपण अनाथ आहोत, आपला डॅडा आणि आजी हे आपले खरे नातेवाईक नाहीत, हे दीपिकाला कळले आहे. हे ऐकून दीपिकाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता दीपिकाने इनामदारांचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी रागाने घराबाहेर पडलेली दीपिका कार्तिकीच्या घरी पोहचते. इथे आल्यावर ती कार्तिकीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगते. यावेळी दीपिका देखील कार्तिकीला कार्तिकशी का बोलत नाही, यामागचं कारण सांगते.
मात्र, यानंतर ती पुन्हा गायब होते. या प्रकरणात दीपाला अटक देखील होते. मात्र, नंतर दीपिका सापडल्याने ती यातून सुटून बाहेर येणार आहे. मात्र, आता दीपिकाने आपण इनामदारांच्या घरात जाणार नाही, असा निर्धार केला आहे. आता दीपिकाची समजूत काढेपर्यंत दीपा तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तर, दीपिकाऐवजी सौंदर्या कार्तिकीला घरी घेऊन जाणार आहे.
हेही वाचा :
- Will Smith Won Oscars 2022 : विल स्मिथ, हॉलिवूडमधील घराघरात पोहोचलेलं नाव, अष्टपैलू 'फ्रेश प्रिन्स'ची गाजलेली कारकीर्द
- Oscars 2022 : भारताची 'रायटिंग विथ फायर' डॉक्यूमेंट्री ऑस्करच्या शर्यतीत राहिली मागे; पाहा कोणत्या चित्रपटानं पटकावला पुरस्कार
- Oscars 2022 : ऑस्करमध्ये 'ड्युन'चा ‘सिक्सर’! ‘बेस्ट फिल्म एडिटिंग’ ते ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’सह पटकावले 6 पुरस्कार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha