एक्स्प्लोर

Will Smith Won Oscars 2022 : विल स्मिथ, हॉलिवूडमधील घराघरात पोहोचलेलं नाव, अष्टपैलू 'फ्रेश प्रिन्स'ची गाजलेली कारकीर्द

अभिनेता विल स्मिथला नुकतंच सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं असून त्याच्या कारकिर्दीवर एक नजर फिरवूया...

Oscars 2022 : अभिनेता, निर्माता, रॅपर अशा एक न अनेक कलांमध्ये तरबेज असणारं हॉलीवूडमधील नाव म्हणजे 'विल स्मिथ'. नुकतच यंदाच्या ऑस्कर्स पुरस्करांचं वितरण झालं यावेळी अभिनेता विल स्मिथला (Will Smith) सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याला 'किंग रिचर्ड' (King Richards) या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  तर वयाच्या 53 व्या वर्षीही हॉलीवूडसारख्या मोठ्या फिल्म इंडस्ट्रीत सर्व अभिनेत्यांना पछाडत ऑस्कर जिंकणाऱ्या विलच्या कारकिर्दीवर एक नजर फिरवूया...

25 सप्टेंबर, 1968 रोजी युनायटेड स्टेट्सच्या फिलाडेल्फिया शहरात जन्माला आलेला विलार्ड कॅरोल स्मिथ म्हणजेच आजचा आघाडीचा हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ. आपल्या फ्रेश प्रिन्स या स्टेज नेमनेही प्रसिद्ध असणारा विल अभिनेता, निर्माता, रॅपर अशा विविध रोल्समध्ये अप्रतिम कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. ऑस्कर्स, गोल्डन ग्लोब पुरस्कार, स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार, ब्रिटीश अॅकेडमी पुरस्कारांसह अनेक इतर पुरस्कारांनी विलचा आजवर सन्मान करण्यात आला आहे. त्याच्या सिनेमांनी आजवर कोट्यवधींची कमाई जगभरातील बॉक्स ऑफिसवर केली असून अनेक आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफीस रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत.
 
विलने त्याचा बालपणीचा मित्र जेफरीसोबत मिळून सर्वात आधी एक हीप हॉप ड्यओ बॅन्ड तयार करत अल्बम्स तयार केले. 1984 ते 1994 या काळात समरटाईम, रिंग माय बेल, पॅरन्ट्स डोन्ड अंडरस्टँड, अ नाईटमेयर ऑन माय स्ट्रीट आणि बूम स्नेक इन द रुम हे पाच अल्बम रिलीज केले. यांना प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर त्याने काही सोलो अल्बमही तयार केले. अभिनय क्षेत्रात विलला सर्वात आधी छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळाली. त्याने द फ्रेश प्रिन्स बेल एअर या टीव्ही सिरीयलमध्ये केलेल्या अभिनयामुळे ९० च्या दशकात त्याची लोकप्रियता तुफान वाढली. त्यासाठी त्याला काही पुरस्कार देखील मिळाले. त्यानंतर बॅड बॉईस या 1995 साली प्रदर्शित झालेल्या अॅक्शन फिल्ममधून मोठ्या पडद्यावरही विलने त्याचा दबदबा निर्माण केला. यानंतर बॅड बॉयस 2 (2003) मधून त्याने पुन्हा एकदा अॅक्शनचा धडाकेबाज परफॉरमन्स सर्वांना दाखवला. 

मेन इन ब्लॅक या फिल्म सिरीजमधील विलची एजंट जेची भूमिका भारतीयांमध्ये त्याला लोकप्रिय करण्यात सर्वात यशस्वी ठरली. मेन इन ब्लॅकच्या तिन्ही पार्टमध्ये विलने दमदार अभिनय केला.  प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांच्या जीवनावर आधारीत अली (2001) चित्रपटात विलच्या भूमिकेने सर्वांचीच मनं जिंकली. या चित्रपटातून त्याला पहिलं वहिलं ऑस्कर नॉमिनेशन मिळालं. त्यानंतर हॉलीवुडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असणाऱ्या द परस्युट ऑफ हॅपिनेस  (The Pursuit of Happyness) या 2006 साली प्रदर्शित चित्रपटाने जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना विलच्या अॅक्शन व्यतीरिक्त अभिनयाची ओळख करुन दिली. यासाठी त्याला दुसऱ्यांदा ऑस्कर नॉमिनेशन मिळालं. यानंतर आजवर एक न अनेक चित्रपटांतून विलने उत्कृष्ट परफॉर्मन्स देत सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्यात आता त्या 'किंग रिचर्ड्स'  चित्रपटासाठी ऑस्कर मिळाल्यामुळे त्याची लोकप्रियता आणि प्रसिद्धी आणखी वाढली आहे.

मुलगा जेडनचंही वडिलांच्या पावलावर पाऊल

विलच्या वैयक्तीक जीवनाचा विचार करता विलने अभिनेत्री sheree zampino हिच्यासोबत 1992 साली लग्न केलं. पण 3 वर्षात म्हणजेच 1995 मध्ये त्याने तिच्यापासून वेगळं होत जेडा पिंकेटसोबत लग्नगाठ बांधली. दरम्यान विल आणि  शिर यांना एक मुलगा असून तोही अभिनेता आहे. ट्रे स्मिथ असं त्याचं नाव आहे. तर जेडा आणि विल यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. जेडन असं मुलाचं तर विलो असं मुलीचं नाव आहे. या तिन्ही मुलातील जेडन हा सर्वात प्रसिद्ध असून त्याने वडिल विल यांच्यासोबत द परस्युट ऑफ हॅपिनेस चित्रपटात केलेल्या भूमिकेतून सर्वात पहिला उत्कृष्ट परफोरमन्स दिला. त्याचा द कराटे किड हा जॅकी चॅनसोबतचा चित्रपट तर भारतातील घराघरात प्रसिद्ध आहे. जेडन हा देखील अभिनय, रॅप अशा एकाहून अधिक कलांमध्ये तरबेज असल्याने त्यानेही विलच्या पावलावर पाऊल ठेवलं असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

  • LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Embed widget