Shooting In Texas : टेक्सास गोळीबार प्रकरण; प्रियांका चोप्रा शोक व्यक्त करत म्हणाली...
अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Priyanka Chopra : अमेरिकेमधील टेक्सास येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली आहेत. या गोळीबारामुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्लेखोर ठार झाला. या प्रकरणाबाबत आता अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रियांकाची पोस्ट
प्रियांकानं तिच्या इंन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये एक न्यूज आर्टिकलचा स्क्रिनशॉर्ट शेअर केलं आहे. या आर्टिकला तिनं कॅप्शन दिलं, 'केवळ श्रद्धांजली वाहणे पुरेसे नाही. त्यापेक्षा जास्त काही तरी केलं पाहिजे. या घटनेबाबत ऐकून खूप दु:ख झालं ' प्रियांकाच्या या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
सेलेना गोमेजची पोस्ट
तसेच गायिका सेलेना गोमेजनं तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं या पोस्टमध्ये लिहिलं, 'आज माझ्या टेक्सास राज्यात 18 निष्पाप मुले ठार झाली. यात एका शिक्षकाचाही मृत्यू झाला. शाळेत मुले सुरक्षित नसतील तर ते सुरक्षित कुठे आहेत?'
Today in my home state of Texas 18 innocent students were killed while simply trying to get an education. A teacher killed doing her job; an invaluable yet sadly under appreciated job. If children aren’t safe at school where are they safe?
— Selena Gomez (@selenagomez) May 25, 2022
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी ही टेक्सासच्या इतिहासातील सर्वात मोठी गोळीबार असल्याचं म्हटलं आहे. हल्लेखोर हा 18 वर्षीय तरुण असून तो गोळीबार करत उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत घुसला, असं सांगण्यात येत आहे. त्यावेळी त्याच्या समोर जे कोणी आलं, त्यांच्यावर त्यानं गोळीबार केला. हल्लेखोराचं नाव साल्वाडोर रामोस असल्याचं सांगितलं जात आहे.
संबंधित बातम्या