Dharmaveer 2 : 'मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाफ्याचा हार स्वीकारताना...'; अभिनेता प्रसाद ओकने सांगितला 'धर्मवीर 2' वेळचा थरारक अनुभव
Dharmaveer 2 : Dharmaveer 2 :धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी अभिनेता प्रसाद ओकने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Dharmaveer 2 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. बहुप्रतिक्षित 'धर्मवीर -2' हा सिनेमा येत्या 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या भागाचा प्रतिसाद पाहता हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. त्यामुळे सध्या या सिनेमाची बरीच चर्चा सुरु आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
प्रसाद ओकच्या अभिनयाचं पहिल्या भागापासून कौतुक केलं जात आहे. दुसऱ्या भागात देखील प्रसादचा अभिनय पाहून ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी देखील कौतुक केलं. या सोहळ्याच्या सुरुवातीला पहिल्या भागातील गुरुपौर्णिमा या गाण्यावर एक परफॉर्मन्स सादर करण्यात आला. त्यावर आता प्रसादने एक भावनिक पोस्ट केली आहे.
ट्रेलर लॉन्च सोहळ्याचा परफॉर्मन्स
या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला गुरुपौर्णिमा या गाण्याचा सीन करत आनंद दिघेंच्या भूमिकेत असलेल्या प्रसादला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाफाच्या हार घातला. यावेळी सिनेमात मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिकेत असलेला क्षितिज दातेही मंचावर होता. त्यामुळे रिल आणि रिअल एकनाथ शिंदे आणि आनंद दिघेंच्या भूमिकेत असलेला प्रसाद ओक या तिघांचा फोटोही बराच चर्चेत आला.
View this post on Instagram
प्रसादची पोस्ट काय?
प्रसादने हे क्षण त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, काल गुरुपौर्णिमेच्या पूर्व संध्येला धर्मवीर 2 चा ट्रेलर प्रदर्शित झाला.गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानी, माझ्या अत्यंत जवळच्या लोकांच्या आणि अनेक गुरुतूल्य व्यक्तींच्या उपस्थितींनी हा सोहळा अजूनच देखणा झाला.मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाफ्याचा हार स्वीकारताना दिघे साहेबांच्या पाठीवर असलेल्या हाताची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षानी झाली. ह्या अनमोल क्षणांसाठी धर्मवीरच्या संपूर्ण संचाचे मनःपूर्वक आभार मानतो.
View this post on Instagram