![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'सरकार बदललं असलं तरीही 'मराठी नाट्य विश्व' हा प्रकल्प व्हायलाच हवा', लोकप्रिय मराठी दिग्दर्शकाची सरकारकडे आग्रही मागणी
Vijay Kenkre on Marathi Natya Vishwa : मराठी नाट्य विश्व प्रकल्पासाठी लोकप्रिय मराठी दिग्दर्शकाने सरकारकडे आग्रही मागणी केली आहे.
!['सरकार बदललं असलं तरीही 'मराठी नाट्य विश्व' हा प्रकल्प व्हायलाच हवा', लोकप्रिय मराठी दिग्दर्शकाची सरकारकडे आग्रही मागणी Vijay Kenkare Marathi Director reaction on Marathi Natya Vishwa Project in Mumbai why it is stopped 'सरकार बदललं असलं तरीही 'मराठी नाट्य विश्व' हा प्रकल्प व्हायलाच हवा', लोकप्रिय मराठी दिग्दर्शकाची सरकारकडे आग्रही मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/21/5a75976ea126528cc415376a99b44d341721572293397720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijay Kenkre on Marathi Natya Vishwa : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यकाळात मराठी कलाकारांनी 'मराठी नाट्य विश्व' (Marathi Natya Vishwa) या संग्रहालयाच्या प्रकल्पाची बांधणी केली. या प्रकल्पासाठी गिरगांव चौपाटीजवळ असलेल्या बिर्ला क्रिडा संकुलची निवड देखील करण्यात आली होती. विजय केंकरे, सखी गोखले, मुक्ता बर्वे, सुबोध भावे यांसह अनेक कलाकार मंडळी यासाठी काम करत होती. पण सध्या या प्रकल्पाला ब्रेक लागला असून अद्याप यासंदर्भातली कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.
याविषयी दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाची रचना देखील तयार असून या प्रकल्पाला ब्रेक का लागला? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळा हा अडीच वर्षांचा होता. त्यानंतर सरकार बदलल्यामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे सरकार जरी बदललं असलं तरी हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवी अशी आग्रही मागणी देखील विजय केंकरे यांनी केली आहे.
सध्या प्रकल्प पूर्ण पूर्णपणे थांबलाय - विजय केंकरे
विजय केंकरे यांनी या प्रकल्पाविषयी बोलताना म्हटलं की, 'आम्ही थिएटर म्युझियम ही संकल्पना उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सुरु केली होती. गिरगांव चौपाटीच्या इथलं बिर्ला क्रिडा केंद्र पाडून तिथे थिएटर म्युझियम होणार होतं. यामध्ये मी, हृषीकेश जोशी, राजन भिसे, सखी गोखले, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ही मंडळी होती. सुबोध त्याचा प्रमुख असणार होता. सरकार आणि आमच्या मधला पूल म्हणून आदेश बांदेकर अशी ती रचना होती. त्या प्रकल्पाचं सगळं बेसिक काम तयार आहे, पण सध्या तो प्रकल्प पूर्णपणे थांबला आहे.'
'ते सुरु व्हायलाच हवं'
हे संग्रहालय सुरु होण्याची आग्रही मागणी धरत विजय केंकरे यांनी म्हटलं की, 'सुरुवातीच्या काळात शरद पोंक्षेही यामध्ये होता. एका मिटींगला तो हजरही होता. तो प्रकल्प इतका पुढे गेला होता की, महानगर पालिकेकडूनही सगळ्या परवानग्या मिळवल्या आहेत. मला असं वाटतं की, या निमित्ताने मुंबईसारख्या ठिकाणी अशी वास्तू होईल. त्याची दालनं कशी असावीत, इतर गोष्टी कशा असाव्यात अशी सगळी रचना तयार आहे. ते का होत नाही, याची कारणं मला महित नाही. पण ते सुरु व्हायलाच हवं, हे माझं आवाहन नाही तर माझा आग्रह आहे. असंही सरकार कुठलं असावं याचा आमच्या प्रकल्पाशी संबंध नाही.'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'हे मी माझ्यासाठी सांगतोय, की तुम्ही त्या ठिकाणी कुणालाही निवडा पण तो प्रकल्प तडीस घेऊन जा. मुंबईच्या समुद्रकिनारी एका अशी वास्तू, त्यामध्ये 600 लोकांच्या क्षमेतेचं एक नाट्यगृह, त्याच्या टेरेसवर एक नाट्यगृह, कॅफे अशा सगळ्या गोष्टी होत्या. लोकांनाही ते पाहायला आवडेल. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा.'
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)