Pradeep Ranganathan Life Story: फिल्मसाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी, पण वडिलांपासून लपवलं; अखेर नशीब चमकलं, आता ब्लॉकबस्टर किंग म्हणून ओळखला जातो 'हा' अभिनेता
Pradeep Ranganathan Life Story: आपल्या वडिलांपासून त्यानं त्याचं सिनेमांमध्ये काम करण्याचं स्वप्नही लपवून ठेवलेलं. पण, एका ठराविक काळानंतर मात्र त्यानं गपचूप आपलं पॅशन फॉलो करण्याचा निर्णय घेतला.

Pradeep Ranganathan Life Story: साऊथ सिनेस्टार प्रदीप रंगनाथन म्हणजे, एक सुप्रसिद्ध चेहरा... हा अभिनेता सध्या युथआयकॉन बनला आहे. सलग लागोपाठ दोन ब्लॉकबस्टर दिलेल्या या अभिनेत्यानं चाहत्यांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रदीप रंगनाथननं 'लव्ह टुडे' आणि 'ड्रॅगन' हे दोन बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. आता त्याचे दोन सिनेमे पाीपलाईनमध्ये आहेत. खरं तर दिवाळीतच त्याचे दोन्ही सिनेमे थिएटरमध्ये रिलीज होणार होते. पण, स्वतःच्याच सिनेमांमधलं बॉक्स ऑफिस बॅटल टाळण्यासाठी अभिनेत्यानं दोनपैकी एक सिनेमा पुढे ढकलला. प्रदीपचे 'ड्यूड' आणि 'लव्ह इन्शुरन्स कंपनी' हे दोन सिनेमे रिलीज होणार होते. पण, संघर्ष टाळण्यासाठी 'लव्ह इन्शुरन्स कंपनी' हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. आगामी सिनेमांच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रदीपनं त्याच्या आयुष्याबद्दल भाष्य केलंय.
प्रदीप रंगनाथननं (Pradeep Ranganathan) अनुपमा चोपडाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आपल्या स्ट्रगलिंग काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यानं सांगितलं की, त्यावेळी तो सिनेमांबाबतचं प्रेम तो त्यांच्या वडिलांसमोर कधीच व्यक्त करायचा नाही. आपल्या वडिलांपासून त्यानं त्याचं सिनेमांमध्ये काम करण्याचं स्वप्नही लपवून ठेवलेलं. पण, एका ठराविक काळानंतर मात्र त्यानं गपचूप आपलं पॅशन फॉलो करण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
प्रदीप म्हणाला की, "जेव्हा मी सुरुवात केलेली, त्यावेळी माझ्या पालकांना फिल्म इंडस्ट्रीवर अजिबात विश्वास नव्हता. मी त्यावेळी माझाय आयटीमधला जॉब सोडून दिलेला. मी दीड वर्षापर्यंत आयटीमध्ये काम केलं, पण नंतर मला छोट्या-मोठ्या जाहिरातींमध्ये काम मिळू लागलं. त्यामुळे मी माझ्या आईला सांगितलं की, आई मी नोकरी सोडलीय. आईला सांगितलं की, वडिलांना अजिबात सांगू नकोस की, मी नोकरी सोडली... मी त्यांना दाखवायचो की, मी घरातून काम करतोय... माझ्या आईला जितके दिवस शक्य झालं, तितके दिवस मी लपवून ठेवलं... असं तब्बल दीड वर्ष चाललं..."
प्रदीप पुढे म्हणाला, "माझ्या वडिलांना वाटलं होतं की, मी रात्रीच्या शिफ्टला जातोय, म्हणून जेव्हा ते उठायचे, तेव्हा मी झोपायचो... माझी आई त्यांना म्हणायची, "बिचारा, रात्रभर काम करून थकलाय...' म्हणून तिनं मला मदत केली. मी जे काही पैसे वाचवायचो, त्यावर मी काम करायचो..." जेव्हा प्रदीपनं 'कोमली' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं, तेव्हा त्याच्या वडिलांना सत्य समजलं.
दरम्यान, प्रदीप रंगनाथनची हिट फिल्म लव्ह टुडे आणि ड्रॅगनबाबत बोलायचं झालं तर, या फिल्म्सनी बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केलेली. लव्ह टुडे 5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेली फिल्म होती आणि या फिल्मनं बॉक्स ऑफिसवर 105 कोटींचा बिजनेस केलेला. तसेच, ड्रॅगन फिल्मबाबत बोलायचं झालं तर, 35-37 कोटींमध्ये बनलेली आणि या फिल्मनं 100 कोटींहून अधिक कलेक्शन केलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























