Pet Puran Trailer : सई- ललितची भन्नाट केमिस्ट्री; 'पेट पुराण' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
पेट पुराण (Pet Puran) या सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Pet Puran Trailer : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांची पेट पुराण (Pet Puran) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सईनं या सीरिजचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सईनं या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'bow wow, meow, meow वेल कम टू द पेट पॅरेंटिंग' सहा मे रोजी ही वेब सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रदर्शित होणार आहे. सईनं या सीरिजमध्ये अदिती ही भूमिका साकारली आहे, तर ललित हा अतुल या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सईनं शेअर केलेल्या या ट्रेलरला पर्ण पेठे, जितेंद्र जोशी, स्वप्निल जोशी, अमेय वाघ, प्रिया बापट आणि सई लोकूर या कलाकरांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. पेट पुराण ही सीरिज मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये पाहता येईल.
View this post on Instagram
सीरिजचे दिग्दर्शन आणि लेखन ज्ञानेश जोटिंग यांनी केली आहे. ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोची निर्माती केली आहे.
संबंधित बातम्या