Indian Idol Marathi : पनवेलचा सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडल मराठी' च्या पहिल्या पर्वाचा विजेता!
Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या पर्वाचा विजेता पनवेलचा सागर म्हात्रे ठरला आहे.
![Indian Idol Marathi : पनवेलचा सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडल मराठी' च्या पहिल्या पर्वाचा विजेता! Sagar Mhatre of Panvel became the winner of the first episode of Indian Idol Marathi Indian Idol Marathi : पनवेलचा सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडल मराठी' च्या पहिल्या पर्वाचा विजेता!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/de3382d7cf39e2990bb029b5e716a977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी'चा (Indian Idol Marathi) नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विनर कोण होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. पनवेलचा सागर म्हात्रे (Sagar Mhatre) 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते.
कोण आहे सागर म्हात्रे?
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे पेशाने इंजिनियर असला तरीही त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. 'गाडीवान दादा' असं टोपणनाव पडलेल्या सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे.
View this post on Instagram
स्पर्धेत टॉप 14 स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मेहेनत, जिद्द, रियाज या जोरावर परिक्षकांची व्हा व्हा मिळवत तब्बल 8 'झिंगाट परफॉर्मन्स' मिळवले. हिंदी, मराठी सर्वप्रकारची गाणी गात, दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या कौतुकासही सागर पात्र ठरला. आता 'इंडियन आयडल मराठी' च्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले आहे. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Indian Idol Marathi : 'आवाज महाराष्ट्राचा' कोण ठरणार? पहिल्या मराठी 'इंडियन आयडल'चा फैसला आज
Rohit Shetty : रोहित शेट्टीचे ओटीटीवर पदार्पण, 'Indian Police Force' वेब सीरिजची केली घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)