Parna Pethe : नवीन कलाकारांच्या फौजेत कसलेल्या अभिनेत्रीची दमदार भूमिका, 'विषय हार्ड' सिनेमातून पर्ण पेठे येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Parna Pethe : विषय हार्ड हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Parna Pethe : रमा माधव, वायझेड, फास्टर फेणे, मिडियम स्पायसी या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री पर्ण पेठे (Parna Pethe) ही प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर पर्ण ही काहीशी रंगभूमीवर रमली असल्याचं पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा पर्ण मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'विषय हार्ड' (Vishay Hard) या सिनेमात पर्ण महत्त्वाची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे नवीन कलाकारांच्या फौजेत पर्ण प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड 'हा चित्रपट सिनेमा येत्या 5 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचा टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झालेली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील दृश्ये आणि संवाद चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत.
पर्ण पेठेची दमदार भूमिका
पर्ण पेठे या कसलेल्या अभिनेत्रीने आपली नायिकेची भूमिका अतिशय दमदारपणे वठवली आहे. या चित्रपटाद्वारे सुमित हा नवोदित कलाकार लेखक, दिग्दर्शक, नायक आणि निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नवोदित असूनही आपली छाप पाडण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्या भूमिकाही उत्कृष्ट झाल्या आहेत.
View this post on Instagram
सिनेमाची कथी नेमकी काय?
ही नेहमीची प्रेमकथा नाही. कारण त्यामधील नायक आणि नायिकेसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांचं 12 वर्षांचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त 5 तास आहेत. परिस्थितीमधील विचित्र संकटांना तोंड देताना जो गोंधळ उडतो, त्यातून हास्यकल्लोळ निर्माण होतो, त्याचबरोबर काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. हे सर्व प्रसंग अतिशय कलात्मक पद्धतीने एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील परिस्थितीचे चित्रण त्यामध्ये आहे, त्याशिवाय कुटुंब, समाज, राजकारण अशा सर्वच बाजूंना स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. केवळ तरुणाईच नव्हे तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट आकर्षित करणारा आहे.