Neha Mahajan : नेहा महाजन मोठ्या पडद्यावरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; बाबू सिनेमात साकारणारी महत्त्वाची भूमिका
Neha Mahajan : नेहा महाजन ही लवकरच तिच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Neha Mahajan : 'कॉफी आणि बरंच काही', 'तुझं तू माझं मी', 'युथ', 'निळकंठ मास्तर' या सिनेमातून अभिनेत्री नेहा महाजन (Neha Mahajan) ही प्रेक्षकांच्या भेटीला आली. मागील वर्षी तिचा 'गडद अंधार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाबू या सिनेमात नेहा ही सुनीता ही भूमिका साकारणार आहे. या सिनेमात ती अंकित मोहनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
अस्सल आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवाणारा स्टायलिश ‘बाबू’ 2 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बाबूची भूमिका अंकित मोहन साकारणार आहे. तसेच सुनीता ही व्यक्तिरेखी नेहा साकारणार आहे. नुकतीच सोशल मीडियावर या सिनेमाची झलक दाखवण्यात आली होती. त्यामुळे आता प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बाबू सिनेमाविषयी
समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर, बाबू कृष्णा भोईर यांनी केली आहे.तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. या सिनेमाचं पोस्टर पाहून हा एक अॅक्शनपट असणार आहे, याचा अंदाज प्रेक्षकांना आलाच आहे. पण यामध्ये नेहाचं पात्र नेमकं कसं असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
नेहाचा सिनेप्रवास...
नेहाने आतापर्यंत अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. कॉफी आणि बरंच काही, तुझं तू माझं मी, नीळकंठ मास्तर, युथ, आजोबा, फ्रेंड्स, हे नेहाचे काही गाजलेले सिनेमे आहेत. तसेच तिने एका दाक्षिणात्य सिनेमासाठी न्यूड सीन देखील दिला होता. त्यामुळएही नेहा सर्वाधिक चर्चेत आली होती. दरम्यान तिच्या या सिनेमाला भारतात बंदी घालण्यात आली होती.
View this post on Instagram