Munawar Faruqui : जस्टिन बीबरच्या आजारपणाबाबत मुनव्वर फारुकीनं शेअर केली पोस्ट; नेटकरी म्हणाले, 'मी तुझा फॅन आहे पण...'
मुनव्वर फारुकीनं (Munawar Faruqui) सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टमुळे अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत.
Munawar Faruqui : प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) हा सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. ‘रामसे हंट सिंड्रोम’ (Ramsay Hunt Syndrome) या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याचे सगळे शो रद्द करण्यात आले. जस्टिनने त्याच्या चेहऱ्याला अर्धा चेहरा अर्धांगवायू झाला असल्याचे एक व्हिडीओ शेअर करुन सांगितले. आता अभिनेता मुनव्वर फारुकीनं (Munawar Faruqui) जस्टिनच्या या आजाराबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे अनेक नेटकरी सध्या मुनव्वर फारुकीला ट्रोल करत आहेत.
मुनव्वरनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'प्रिय जस्टिन बीबर, मी तुला पूर्णपणे समजू शकतो. इथे भारतात देखील उजवी बाजू नीट काम करत नाही.' मुनव्वरनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन त्याला ट्रोल केले. एक नेटकरी म्हणाला,' एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाबाबत अशी चेष्टा करणं हे दर्शवते की,तू किती असंवेदनशील आहेस.' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'मी तुझा फॅन आहे पण एखाद्याच्या या दु:खाचा असा विनोद करणं हे योग्य नाही. या तुझ्या बोलण्यानं लक्षात येतं की तुला अहंकार आला आहे. '
Dear Justin Bieber,
— munawar faruqui (@munawar0018) June 11, 2022
i can totally understand
Even here in india right side
not working properly.
जस्टिन बीबरनं शेअर केला व्हिडीओ
जस्टिन बीबरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन ‘रामसे हंट सिंड्रोम’ या आजाराबाबत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली. व्हिडीओमध्ये जस्टिन म्हणतो, , ‘तुम्ही बघू शकता, मी माझे डोळे देखील मिचकवू शकत नाही. माझ्या चेहऱ्याच्या या बाजूने मी हसूही शकत नाही. माझा शो रद्द होण्याचे हेच कारण आहे. बरेच लोक यामुळे निराश झाले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी यावेळी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. मला आशा आहे की, तुम्ही लोक मला समजून घ्याल.’
मुनव्वरच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
मुनव्वरच्या सोशल मीडियावरील पोस्ट या चर्चेत असतात. त्यानं केलेल्या पोस्टला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा लॉक अप कार्यक्रमाचा विजेता ठरला. या कार्यक्रमामुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली.
संबंधित बातम्या:
- Siddhant Kapoor : शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्सचं सेवन केल्याचं निष्पन्न
- Ramsay Hunt Syndrome: चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका देणारा ‘रामसे हंट सिंड्रोम’ आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणे
- Happy Birthday Disha Patani : अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात दिशाला करायचं होतं काम; मॉडलिंगनं करिअरला सुरुवात