(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bollywood actress : नाना पाटेकरांसोबत नाव जोडलं, पण वयाच्या 53 व्या वर्षीही प्रेमाच्या शोधात आहे बॉलीवूड अभिनेत्री;म्हणाली...
Manisha Koirala On Relationship: अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला असून आजही ही अभिनेत्री प्रेमाच्या शोधात आहे.
Manisha Koirala On Relationship: बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईरालाने (Manisha Koirala) अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री नुकतीच संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हिरामंडी' (Heeramandi) या सिरिजमध्ये दिसली होती. ही सिरिज प्रेक्षकांच्याही तितकीच पसंतीस पडली आहे. पण याच अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.
हिरामंडीच्या यशानंतर आता मनीषा कोईरालाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी अभिनेत्रीने ती नेहमीच चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात पडली असल्याचं म्हटलं. त्याचप्रमाणे वयाच्या 53 व्या वर्षी देखील ही अभिनेत्री खऱ्या आणि प्रामाणिक जोडीदाराच्या शोधात आहे.
मनीष कोईरालाने काय म्हटलं?
फिल्मफेअरशी संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली,माझ्या ही गोष्ट लक्षात आली आहे की आजवर मी फक्त चुकीच्या पुरुषांच्याच प्रेमात का पडले आहे. मी हे पुन्हा पुन्हा का करत आहे, असा प्रश्न मला पडला.माझ्यात काहीतरी चूकीचं आहे किंवा मी फक्त सर्वात त्रासदायक किंवा चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होते. पण मी स्वत:चं परीक्षण केलं. मला ज्या गोष्टीचा त्रास होत होता त्यावर मी निर्णय घेतला आणि काम केले.
मी 5-6 वर्षांपासून एकटी आहे - मनीषा कोईराला
मनीष कोईरालानेही मुलाखतीत खुलासा केला की, ती 5-6 वर्षांपासून एकटी आहे. यावर अभिनेत्रीने म्हटलं की, गेल्या 5-6 वर्षांपासून मी एकटी आहे आणि सध्या मी कोणाशीही नात जोडण्याचा माझा विचार नाही. मला आजही असं वाटतं की मला स्वत:वर काम करण्याची गरज आहे.
मी एका चांगल्या जोडीदाराच्या शोधात - मनीषा
अभिनेत्रीने पुढे म्हटलं की, एका चांगल्या नात्यात येण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये आम्ही दोघेही एकमेकांना सांभाळून घेऊ. एकमेकांशी प्रामाणिक राहणाऱ्या जोडीदाराच्या शोधात मी आहे. पुढे जाण्यासाठी आपल्याला काय शिकले पाहिजे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या प्रवासात आपण एकमेकांना साथ देऊ शकतो की नाही हे देखील महत्त्वाचे आहे. मला अशा व्यक्तीसोबत राहायचे आहे ज्याची काही स्वप्न आहेत. कारण मी खूप भावनिक व्यक्ती आहे.
2010 मध्ये सम्राट दहलसोबत केलं होतं लग्न
मनीषा कोईराला अनेक कलाकारांसोबत नातं जोडलं गेलं होतं. यामध्ये नाना पाटेकर यांच्यासह अनेक कलाकार होते. पण तिने बिझनेसमन सम्राट दहलसोबत लग्न केले. मनीषा आणि सम्राटचे 2010 मध्ये लग्न झाले आणि 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
ही बातमी वाचा :