Hina Khan : 'फॉलोअर्स वाढवण्यासाठी नाटकं, तिला कॅन्सर झाला नाही'; हिना खानच्या आजरावर बिग बॉसमधील स्पर्धकाची टीप्पणी
Hina Khan : बॉलीवूड अभिनेत्री नेहा खान ही सध्या कर्करोगाशी झुंजत आहे. पण तिचा हा आजार खोटा असल्याचं बिग बॉसच्या स्पर्धकाने म्हटलं आहे.

Hina Khan : अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिने काही दिवसांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने तिच्या पहिल्या केमोथेरपीचा देखील व्हिडीओ शेअर केला होता. तसेच नुकतच तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या शरीरावर डाग, बारीक झालेले केस असं सगळं दिसत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत हिनाला धीर दिलाय. पण बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाने मात्र तिचा हा आजार खोटा असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान हिनाचा हा आजार खोटा असल्याचा दावा करणारा बिग बॉस ओटीटी 2 मधील स्पर्धक पुनीत सुपरस्टार हा आहे. पुनीतने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एक विचित्र हेअरस्टाईल केली असून त्याने हिनाचा हा आजार कसा खोटा आहे, याविषयी भाष्य केलं आहे.
पुनीतने काय म्हटलं?
हिना खानला जर खरंच कॅन्सर झाला असेल तर आपल्या सोशल मीडियावरुन स्वत:च्याच आजाराची पोस्ट कोण करतं? असा सवाल त्याने त्याच्या व्हिडीओमध्ये केला आहे. ह्या लोकांनी हल्ली हे सुरु केलं आहे. स्वत:च्या आजाराविषयी ते सोशल मीडियावर टाकतात, म्हणजे तिथून त्यांचे फोलोअर्स आणि लाईक्स वैगरे वाढतील. मला नाही वाटत हिना खानला कॅन्सर झाला असेल. आता तुम्हीच बघा काही दिवसांनी पुन्हा तिची पोस्ट येईल की मी आता बरी आहे, थ्यँक्यू फॅन्स.
View this post on Instagram
हिना खानची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज
स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री हिना खान हिने पहिल्या केमोथेरपीनंतरचे फोटो शेअर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये हिनाच्या वेगळा प्रेरणात्मक अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या अंगावरील केमोथेरपीचे व्रण तिने अतिशय विश्वासाने दाखवत चाहत्यांसोबत प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे.
ही बातमी वाचा :
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















