Mahesh Babu : महेश बाबूचा किलर स्वॅग; 'SSMB28'ची रिलीज डेट जाहीर, पोस्टरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष
SSMB28 : महेश बाबूच्या आगामी 'एसएसएमबी 28'चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
![Mahesh Babu : महेश बाबूचा किलर स्वॅग; 'SSMB28'ची रिलीज डेट जाहीर, पोस्टरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष Mahesh Babu announces new movie SSMB28 release date know update Mahesh Babu : महेश बाबूचा किलर स्वॅग; 'SSMB28'ची रिलीज डेट जाहीर, पोस्टरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/27/aada275ec9283a0199365244173c83091679897666972254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mahesh Babu SSMB28 Poster : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) सध्या त्याच्या आगामी 'एसएसएमबी 28' (SSMB28) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पोस्टर शेअर करत अभिनेत्याने या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
महेश बाबूने शेअर केलं 'एसएसएमबी 28'चं पोस्टर (Mahesh Babu Shared SSMB28 Poster)
महेश बाबूने सोशल मीडियावर 'एसएसएमबी 28' या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये महेश बाबूचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये महेश बाबू सिगारेट ओढताना दिसत असून त्याच्या आसपास गावकरी दिसत आहेत. पोस्टर शेअर करत महेश बाबूने लिहिलं आहे,"एसएसएमबी 28' 13 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे".
View this post on Instagram
'एसएसएमबी 28' या सिनेमातील महेश बाबूचा किलर स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमात महेश बाबूसोबत पूजा हेगडे आणि श्रीलीलादेखील झळकणार आहे. त्रिविकर श्रीनिवास या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. याआधी त्यांनी महेश बाबूसोबत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे केले आहेत. 'एसएसएमबी 28' हा टॉलिवूडचा एक बिग बजेट सिनेमा आहे.
महेश बाबू आणि प्रभास आमने-सामने
100 कोटींच्या बजेटमध्ये 'एसएसएमबी 28' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा 13 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे प्रभासचा 'प्रोजेक्ट के' (Project K) हा सिनेमा 12 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दोन्ही बिग बजेट सिनेमे असून आता बॉक्स ऑफिसवर महेश बाबू आणि प्रभास आमने-सामने आलेले दिसतील.
महेश बाबू करणार 'SSMB29'च्या शूटिंगला सुरुवात!
महेश बाबूसाठी 2022 हे वर्ष चांगलं नव्हतं. आई, वडील आणि भावाच्या निधनाने त्याला मोठा धक्का बसला. पण आता या धक्क्यातून सावरत सिनेमांत काम करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. महेश बाबू आता एमएस राजामौलींच्या 'SSMB29' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा असून या सिनेमासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
संबंधित बातम्या
Happy Birthday Mahesh Babu : वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी करिअरची सुरुवात, वडिलांमुळे घेतला 9 वर्षाचा ब्रेक! वाचा अभिनेता महेश बाबूबद्दल..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)