Happy Birthday Mahesh Babu : वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी करिअरची सुरुवात, वडिलांमुळे घेतला 9 वर्षाचा ब्रेक! वाचा अभिनेता महेश बाबूबद्दल..
Mahesh Babu Birthday : साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) आज (9 ऑगस्ट) त्याचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे.
Mahesh Babu Birthday : साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) आज (9 ऑगस्ट) त्याचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे. टॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेश बाबूने वयाच्या चौथ्या वर्षी ‘नीदा’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. महेश बाबूचे वडील घटामनेनी शिवा रामा कृष्णा हे देखील तेलुगु मनोरंजन विश्वातील खूप मोठे अभिनेते होते. आजघडीला महेश बाबूची गणना साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. ‘डोकुडू’, ‘पोकिरी’, ‘भारत अने नेनू’, ‘सरकारु वारी पाटा’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीशी निगडीत वातावरणात महेशचे बालपण गेले. 1979मध्ये महेश बाबू त्याच्या वडिलांच्या 'नीदा' या तेलुगु चित्रपटाच्या सेटवर गेला होता. त्यावेळी चित्रपट दिग्दर्शक दासरी नारायण राव यांनी छोट्या महेशसोबत चित्रपटाची काही दृश्ये शूट केली होती. अशाप्रकारे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी महेश बाबूने तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
वडील म्हणाले...
यानंतर महेश बाबूने ‘शंखावरम’, ‘बाजार राउडी’, ‘मुग्गुरु कोडुकुलू’ आणि ‘गुडाचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. या चित्रपटांनंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. पण, त्याच्या वडिलांनी त्याला अभिनय करण्याऐवजी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. यानंतर तो नऊ वर्षे चित्रपटांपासून दूर राहिला. 1999मध्ये त्याने ‘राजा कुमारुडू’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटात प्रिती झिंटा महेश बाबूसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन के राघवेंद्र राव यांनी केले होते. या चित्रपटासाठी महेश बाबूला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा नंदी पुरस्कार मिळाला होता.
गायनातही आजमावले नशीब
2003मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश बाबूचा 'ओकाडू' हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा तेलुगु चित्रपट ठरला होता. या चित्रपटासाठी महेश बाबू यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. महेश बाबूने केवळ अभिनयातच नाही, तर गायनातही हात आजमावला होता. महेशने 'जलसा' आणि 'बादशाह' या चित्रपटांसाठी आवाजही दिला होता. यासोबतच त्याने ‘बिझनेसमन’ या चित्रपटासाठी एक गाणेही गायले आहे.
नम्रता शिरोडकरसोबत जमली जोडी
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर महेश बाबूने 2006मध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत संसार थाटला. लग्नापूर्वी दोघांनी तब्बल चार वर्षे एकमेकांना डेट केले होते. आता दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. दोघेहे नेहमी आपलं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. मनोरंजन विश्वात या दोघांना ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा :
Mahesh Babu : 'बॉलिवूडला मी परवडत नाही'; हिंदी चित्रपटसृष्टीबाबत महेश बाबूचं मोठं वक्तव्य