Maharani 4 Teaser Huma Qureshi: राणी पुन्हा आली आहे! सोनी लिव्हची सिरीज 'महाराणी 4'च्या टीझर प्रदर्शित; शक्तिशाली, साहसी राणी भारती
Maharani 4 Teaser Huma Qureshi: निरक्षर गृहिणीपासून सत्तेला हादरवून टाकण्याचं धाडस दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सत्तेसाठी संघर्ष, विश्वासघात आणि राजकीय युद्ध नव्या उंचीवर पोहोचलं आहे, जिथे हा सीझन अधिक लक्षवेधक आणि रोमांचक असेल.

Maharani 4 Teaser Huma Qureshi: 'महारानी' परतली आहे आणि सोनी लिव्हनं नवा टीझरही रीलीज केला आहे. 'महाराणी 4' (Maharani 4) मध्ये पुन्हा एकदा हुमा कुरेशी दिसणार आहे, जी नीडर राणी भारतीच्या भूमिकेत अधिक प्रखरतेनं भर टाकणार आहे. निरक्षर गृहिणीपासून सत्तेला हादरवून टाकण्याचं धाडस दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सत्तेसाठी संघर्ष, विश्वासघात आणि राजकीय युद्ध नव्या उंचीवर पोहोचलं आहे, जिथे हा सीझन अधिक लक्षवेधक आणि रोमांचक असेल.
अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) लवकरच तिचा ओटीटी शो (OTT Show) 'महारानी'च्या (Maharani Seasion 4) चौथ्या सीझनसह परतणार आहे. सोमवारी, निर्मात्यांनी आगामी सीझनचा पहिला टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये तिचं पात्र अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. राजकारणाच्या या आक्रमक जगात बिहारचं रक्षण करण्यासाठी ती काहीही करण्यास तयार आहे. तिच्या दृढनिश्चयी नजरेनं ती स्वतःशीच बोलत आहे, असं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. खास गोष्ट म्हणजे, हा टीझर हुमाच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. त्यामुळे सीरिजमधील इतर पात्र कोण आहेत? याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
टीझरमध्ये हुमा कुरेश म्हणतेय की, "काहीजण तिला अशिक्षित म्हणतात, काही खुनी, तर काही त्यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणतात. त्यानंतर हुमा दावा करत की, त्यांना राजकारणापेक्षाही आपल्या कुटुंबाप्रती प्रेम आहे, आणि बिहारच तिचं कुटुंब आहे. आणि कोणी जर माझ्या बिहारला नुकसान पोहोचवण्याचा विचार करत असेल, तर संपूर्ण राजकारणात उलथापालथ करुन टाकू..."
'महारानी 4'चा टीझर
टीझरवरुन समजतंय की, रानी भारतातील नव्या आव्हानांचा सामना करणार आहे. तसेच, ती स्वतःची ताकद दाखवणार आहे. सत्ता संघर्ष आणि विश्वासघाताशी दोन हात करत ती लढणार आहे. दरम्यान, 'महारानी 4' कधी रिलीज होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
पाहा टीझर :























