एक्स्प्लोर

KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा

KL Rahul Athiya Shetty Wedding : अथिया शेट्टी आणि केएल राहुल 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अथिया आणि केएल राहुल 23 जानेवारीला सात फेरे घेतील. यासाठी कपलच्या कुटुंबियांनी पूर्ण तयारी केली आहे. अथिया आणि केएल राहुलच्या फंक्शन्सशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात.

दोघांचं लग्न कुठे होणार? 

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा विवाह सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर होणार आहे. काल एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये फार्महाऊसमध्ये मंडपची तयारी सुरु होती. याआधी केएल राहुलच्या घराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याचे घर दिव्यांनी सजवलेले दिसत होते.

सुनील शेट्टीने लग्न घोषित केलं 

सुनील शेट्टी रविवारी लग्नाच्या स्थळी पोहोचले आणि मीडियाशी म्हणाले, 'तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्या मी मुलांना घेऊन येईन तुम्हा लोकांना भेटायला. अशाप्रकारे खुद्द सुनील शेट्टीनेच पुष्टी केली आहे की उद्या म्हणजेच 23 जानेवारीला केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकणार आहेत.

लग्नाआधीची पार्टी

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या फंक्शन्सची आज एका ग्रँड कॉकटेल पार्टीने सुरुवात झाली आहे. ही पार्टी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसाठी ठेवण्यात आली होती. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, पाहुण्यांना जवळच्याच एका आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून ते लग्नाच्या उत्सवाचा आनंद घेऊ शकतील.

हळदी आणि मेहेंदी समारंभ

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा हळदी आणि मेहेंदी समारंभ आज फार्महाऊसवर होणार आहे. यासाठी फार्महाऊस फुलांनी सजवण्यात आले आहे. ई-टाइम्सनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत सात फेरे घेतील.

पाहुण्यांना दक्षिण भारतीय जेवणाची मेजवानी

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नात पाहुण्यांना दक्षिण भारतीय जेवणाची मेजवानी असणार आहे. साऊथची परंपरा लक्षात घेऊन त्यांना केळीच्या पानावर जेवण दिले जाणार आहे. 

रिसेप्शन पार्टीला 3 हजार पाहुण्यांची उपस्थिती

या कपलच्या लग्नानंतर मुंबईत भव्य रिसेप्शन देण्यात येणार आहे, ज्यामध्ये मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या पार्टीला तीन हजार पाहुण्यांची उपस्थिती असेल. 

केएल राहुल आणि अथियाची लव्हस्टोरी 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची पहिली भेट 2019 मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. यानंतर दोघांचे बोलणे सुरू झाले. काही काळानंतर दोघे खूप चांगले मित्र बनले आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जरी दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या पुष्टी केली नसली तरी, हे जोडपे अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Waltair Veerayya: 'वॉलटेर वीरय्या' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चिरंजीवींच्या चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Real Estate Business: कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?
कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?
OTT Release This Week: या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज
या शुक्रवारी OTT वर धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 5 जबरदस्त फिल्म्स-सिरीज
Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
Khashba Teaser Out: फॅन्ड्री, सैराटनंतर नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' येतोय सगळे रेकोर्ड मोडायला! 2 मिनिट 8 सेकंदाच्या टीझरचा धुमाकूळ
फॅन्ड्री, सैराटनंतर नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' येतोय सगळे रेकोर्ड मोडायला! 2 मिनिट 8 सेकंदाच्या टीझरचा धुमाकूळ

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget