कतरिना–विक्कीच्या मुलाच्या नावाचा ‘या’ चित्रपटाशी कनेक्शन; आदित्य धरनेही दिल्या शुभेच्छा
Vicky Kaushal and Katrina Kaif Baby Name: कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी आपल्या मुलाची पहिली झलक शेअर केली आहे. या जोडप्यानं आपल्या मुलाचं नाव विहान कौशल असं ठेवलं आहे.

Katrina Kaif Son Vihaan Kaushal Connection With Dhurandhar Director: विक्की कौशल आणि कतरिनानं चाहत्यांसोबत क्युट सरप्राईज शेअर केलं आहे. दोघांनी आपल्या मुलाची पहिली झलक शेअर करुन त्याचं नावंही चाहत्यांना सांगितलंय. कतरिनानं विक्कीच्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या चित्रपटापासून प्रेरणा घेत मुलाचं नाव ठेवलं आहे. याचं 'धुरंधर' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी संबंधित आहे. खरं तर, कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी सोशल मीडियावर एक क्युट फोटो शेअर केला आहे, तसेच, पोस्टमध्ये आपल्या मुलाचं नाव शेअर केलं आहे.
कतरिना कैफ, विक्की कौशल यांनी मुलाचं नाव विहान कौशल ठेवलं
कतरिना आणि विक्की यांनी फोटो पोस्ट करताना लिहिलंय की, "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा पहिला किरण, विहान कौशल. प्रार्थनांचे उत्तर मिळतं, जीवन सुंदर आहे, आपलं जग एका क्षणात बदलतं..." कतरिना आणि विक्कीच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करुन विहानवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय. तुम्हाला माहितीय का? कतरिना आणि विक्कीनं मुलाचं ठेवलेलं नाव, विक्की कौशलचा सर्वात मोठ्या हिट सिनेमा 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'शी जोडलेलं आहे?"
7 नोव्हेंबर 2025 हा दिवस कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या दिवस होता. या दिवशी कतरिना आई बनली. आता, या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. कतरिनाने विक्कीच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या चित्रपटापासून प्रेरणा घेतली, जो धुरंधर दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी जोडलेला आहे. खरं तर, कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी सोशल मीडियावर एक गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कतरिना आणि विक्की त्यांच्या मुलाचे लहान हात धरलेले दिसतात.
कतरिना कैफ, विक्की कौशलनं मुलाचं नाव विहान कौशल ठेवलंय
View this post on Instagram
फोटो पोस्ट करताना, या जोडप्यानं लिहिलंय की, "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा पहिला किरण, विहान कौशल. प्रार्थनांचं उत्तर मिळतं, जीवन सुंदर आहे, आपलं जग एका क्षणात बदलतं..." युजर्स विहानवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.























