एक्स्प्लोर

2023 मध्ये रिलीज झालेल्या साऊथ फिल्मनं सालार, डंकीला दिलेली टक्कर; पण कॉन्ट्रोवर्सीमुळे हिरो जेलमध्ये गेला अन्...

South Blockbuster Movie : 29 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या 45 कोटींच्या साऊथ चित्रपटानं डंकी-सालारला टक्कर दिली, पण हिरो एका कॉन्ट्रोवर्सीत अकडला आणि त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवलं गेलं.

South Blockbuster Movie : एखादा चित्रपट फ्लॉप, हिट, सुपरहिट की ब्लॉकबस्टर (Blockbuster) ठरतो, हे प्रेक्षकांच्या हातात असतं. अनेकवेळा सुपरस्टार्सच्या बिग बजेट चित्रपटांचं कलेक्शन बॉक्स ऑफिसवर (Box Office) पछाडलं आहे. तर काही वेळा लहान अॅक्टर्सचे कमी बजेटचे चित्रपट प्रेक्षकांना इतके आवडतात की, ते नवे रेकॉर्ड बनवताना दिसत आहेत. डंकी आणि सालारला टक्कर देणाऱ्या 45 कोटी रुपयांच्या चित्रपटाबाबतही असंच काहीसं घडलं, ज्यानं कोणत्याही प्रमोशन किंवा धूमधडाक्याशिवाय बजेटपेक्षा दुप्पट कमाई केली. एवढंच नाही तर 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. पण मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्याला हे यश साजरं करण्याची संधीही मिळाली नाही, कारण एका कॉन्ट्रोवर्सीमुळे या दिग्गज अभिनेत्याला तुरुंगवास भोगावा लागला. एवढंच नाही तर, 2024 मध्येही तो चित्रपटामुळे नाही तर त्याच्यासोबतच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेचा विषय ठरला.

या चित्रपटाचे नाव 'काटेरा' होतं, जो 29 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात कन्नड स्टार दर्शन मुख्य भूमिकेत होता. पॉझिटिव्ह रिव्यू आणि प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम यामुळे या चित्रपटाची कमाई 60 कोटींवर गेली. तर एकूण कलेक्शन 104.58 कोटी रुपये होतं. 1970 च्या दशकात कर्नाटकातील एका गावातल्या वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटाच्या कथेत  दर्शन मुख्य भूमिकेत होता. तर, तरुण सुधीर दिग्दर्शित या ॲक्शन चित्रपटात जगपती बाबू, कुमार गोविंद, विनोद कुमार अल्वा, दानिश अख्तर सैफी आणि श्रुती या कलाकारांनी चित्रपटाच्या कथेला पाठिंबा दिला आहे. रिलीजनंतर हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी ZEE5 OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना अभिनेता अटकेत 

अभिनेता दर्शनबद्दल सांगायचं झालं तर, आपल्याला माहीत आहे की, अभिनेता रेणुकास्वामी खून आणि अपहरण प्रकरणात तुरुंगात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रेणुकास्वामी या चित्रदुर्गाच्या रहिवासी होत्या, ज्यांचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप कन्नड अभिनेता दर्शनसोबत त्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांवर होता. या आरोपावरून अभिनेता दर्शन, पवित्रा गौडा आणि अन्य 15 आरोपींना 11 जून रोजी अटक करण्यात आली होती. चाहत्यानं पवित्रा यांना घाणेरडे आणि अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे.

बंगळुरू सेंट्रल जेलमधील स्टारच्या शाही व्यवहाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर अभिनेत्याला बेल्लारी तुरुंगात हलवण्यात आलं. दर्शनाविरुद्ध तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, त्याला 30 ऑक्टोबर 2024 रोजी मणक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prajakta Mali Net Worth: महागड्या दागिन्यांचा ब्रॅण्ड, कर्जतचं फार्महाऊस अन् बरंच काही; प्राजक्ता माळी आहे कोट्यवधींची मालकीण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget