Prajakta Mali Net Worth: महागड्या दागिन्यांचा ब्रॅण्ड, कर्जतचं फार्महाऊस अन् बरंच काही; प्राजक्ता माळी आहे कोट्यवधींची मालकीण
Prajaktta Mali Net Worth: प्राजक्ता माळी एक हरहुन्नरी अभिनेत्री आहेच, पण त्यासोबतच ती एक बिझनेसवुमनदेखील आहे. तिचं एक फार्महाऊस आहे आणि तिनं नुकतंच निर्माती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे.
Prajaktta Mali Net Worth: मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबत प्राजक्ता माळीचं नाव जोडलं आणि चर्चांना उधाण आलं. याप्रकरणी प्राजक्तानं स्वतः माध्यमांसममोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, तिनं सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन सदर प्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशातच, संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी अभिनेत्रीच्या बाजूनं एकवटली आहे. असं असतानाच आता प्राजक्ता माळीची संपत्ती देखील चर्चेचा विषय ठरत आहे. प्राजक्ताची एकूण संपत्ती किती पाहुयात सविस्तर...
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे. तसेत, सध्या तिच्या संपत्तीबाबतही चर्चा होत आहे. प्राजक्ता एका चित्रपटासाठी किती मानधन घेते? तिचा ज्वेलरी ब्रांड, तिचं फार्महाऊस याबाबत चर्चा रंगली आहे.
प्राजक्ता माळी एक हरहुन्नरी अभिनेत्री आहेच, पण त्यासोबतच ती एक बिझनेसवुमनदेखील आहे. तिचं एक फार्महाऊस आहे आणि तिनं नुकतंच निर्माती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. खरं तर, प्राजक्ता माळीनं टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरुन मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे प्राजक्ता प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिनं काही मालिका आणि चित्रपट केले, पण तिला हवं तसं यश मिळालं नाही. त्यानंतर प्राजक्तानं काही कॉमेडी शोचं अॅकरिंग केलं. प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कॉमेडी शोचं अँकरिंग सुरू केलं. त्यानंतर प्राजक्तानं स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. 'प्राजक्तराज' नावानं पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड प्राजक्तानं सुरू केला.
भावाच्या लग्नात कल्पना आली अन् सुरू केला स्वतःचा ब्रँड
प्राजक्ता भावाच्या लग्नासाठी गेली होती. त्यावेळी तिला लग्नात पारंपरिक दागिने परिधान करायचे होते. पण, तिला त्यावेळी ते कुठेच मिळाले नाहीत. त्यावेळी प्राजक्तानं स्वतःच दागिने घडवण्याचा विचार केला. प्राजक्तानं स्वतःचा ब्रँड काढला. अस्सल महाराष्ट्रातल्या मराठी मातीतले दागिन्यांचा प्राजक्तानं राज्यभरात फिरुन अभ्यास केला. आणि ते सर्व दागिने तिनं घडवले. त्यांचं वैशिष्ट्य ती आपल्या ब्रँडच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवते. त्यानंतर काही दिवसांतच प्राजक्तानं एक मोठं फार्महाऊस खरेदी केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फार्महाऊसमधूनही प्राजक्ता बक्कळ कमाई करते.
कर्जतला प्राजक्ताचं आलिशान फार्महाऊस
प्राजक्तानं ज्वेलरी ब्रँडसोबत आपलं फार्महाऊसही उभारलं आहे. कर्जत येथे निसर्गाच्या सान्निध्यात प्राजक्ताने तिचा 'प्राजक्त कुंज' हा फार्महाऊस खरेदी केला आहे. एकाचवेळी इथे 15-20 माणसं राहू शकतात. प्राजक्ता या फार्महाऊसद्वारे तगडी कमाई करते. प्राजक्ता माळीचा फार्महाऊस म्हणजेच 3 BHK व्हिला आहे. कर्जतमधल गौळवाडी गावात हा असून फार्महाऊसमध्ये 3 बेडरूम्स, हॉल, किचन, स्विमिंगपूल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये विकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारी जायचं असेल तर दिवसाचं भाडं हे 30 हजार रुपये आहे. तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान एका दिवसाचं भाडं 17 ते 20 हजार रुपये आहे.