(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Justin Beiber India Tour : जस्टिन बीबरची 'वर्ल्ड टूर'; भारतातील 'या' शहरात कॉन्सर्ट, तिकीटाची किंमत काय?
Justin Beiber India Tour : जाणून घेऊयात जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टच्या तिकीटाबाबात....
Justin Beiber India Tour : प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर (Justin Bieber) यानं काही दिवसांपूर्वी त्याला झालेल्या ‘रामसे हंट सिंड्रोम’(Ramsay Hunt Syndrome) या आजारची माहिती चाहत्यांना दिली होती. या आजारामुळे जस्टिनला त्याचे अनेक शो रद्द करावे लागले. आता त्याच्या 'जस्टिस वर्ल्ड टूर' ला (Justice World Tour) पुन्हा सुरुवात होणार आहे. या टूरमध्ये इंडिया टूरचा देखील समावेश होणार आहे. जाणून घेऊयात जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टच्या तिकीटाबाबात....
रिपोर्टनुसार, जस्टिन 31 जुलै रोजी इटलीच्या लुक्का समर फेस्टिव्हलमधून 'जस्टिस वर्ल्ड टूर' ची पुन्हा सुरुवात करार आहेत. जस्टिन हा भारत आणि आशिया, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे जाणार आहे. ही वर्ल्ड टूर करुन जस्टिन 2023 मध्ये युरोपमध्ये परतणार आहे.
1.3 मिलियन तिकीट झाली बुक
आत्तापर्यंत जवळपास 1.3 मिलियनपेक्षा जास्त तिकीटे जस्टिनच्या कॉन्सर्टची विकली गेली आहेत. 30 पेक्षा जास्त देशांमध्ये जस्टिनचे कॉन्सर्ट होणार आहे. जस्टिनचं कॉन्सर्ट भारतामध्ये देखील होणार आहे. 18 ऑक्टोबरला जस्टिनचा लाईव्ह शो नवी दिल्लीत होणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडिअमध्ये हा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत चार हजारांपासून सुरु होते. जस्टिनचे चाहते या बुक माय शो इंडिया या अॅप वरुन जस्टिनच्या कॉन्सर्टचे तिकीट विकात घेऊ शकतात.
जस्टिन बीबरनं शेअर केला होता व्हिडीओ
जस्टिन बीबरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन ‘रामसे हंट सिंड्रोम’ या आजाराबाबत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली. व्हिडीओमध्ये जस्टिन म्हणतो, , ‘तुम्ही बघू शकता, मी माझे डोळे देखील मिचकवू शकत नाही. माझ्या चेहऱ्याच्या या बाजूने मी हसूही शकत नाही. माझा शो रद्द होण्याचे हेच कारण आहे. बरेच लोक यामुळे निराश झाले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी यावेळी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. मला आशा आहे की, तुम्ही लोक मला समजून घ्याल.’
हेही वाचा: