Justin Bieber : कोट्यवधींचा बंगला ते महागड्या गाड्या; जस्टिन बिबर आहे अब्जाधीश
Justin Bieber : कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबर सध्या एका गंभीर आजाराशी झुंझ देत आहे.
Justin Bieber Net Worth : कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबर (Justin Bieber) सध्या एका गंभीर आजाराशी झुंझ देत आहे. जस्टिन बिबर रामसे हंट सिंड्रोमने ग्रस्त आहे. यामुळे त्याच्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. त्यामुळे जस्टिनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जस्टिन लवकर बरा व्हावा यासाठी जगभरातील जस्टिनचे चाहते प्रार्थना करत आहेत. जस्टिन बीबर अब्जाधीश आहे. बॉलिवूड सुपरस्टारच्या दुप्पट जस्टिनची संपत्ती आहे.
महागड्या गाड्यांचा समावेश
जस्टिन बिबरची संपत्ती कोट्यवधी नसून अब्जावधी आहे. जस्टिन बिबरकडे जवळजवळ 22 अब्ज 28 कोटी सहा लाख 73 हजार संपत्ती आहे. जस्टिन बिबरची संपत्ती शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या संपत्तीपेक्षा अधिक आहे. जस्टिन बिबर दर महिन्याला 15 कोटी 62 लाख 87 हजार पैसे कमावतो. तसेच जस्टिनकडे 11 कार आहेत. यात ऑडी R8, फरारी आणि रॉल्स रॉयस सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
जस्टिन बिबर आलिशान घरात राहतो. त्याच्या घराची किंमत 25.8 मिलिअन डॉलर आहे. तसेच अनेक बंगलेदेखील त्याच्या नावावर आहेत. यातील एक बंगल्याची किंमत तर 63 कोटींच्या आसपास आहे.
पुन्हा एकदा दौरा पुढे ढकलला!
बीबरचा दौरा पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याचा या आधीचा दौरा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला होता. जस्टिनचा दौरा 2020मध्ये सुरू होणार होता. परंतु, जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या आजारामुळे आधीच 2021पर्यंत उशीर झाला होता. नंतर, पुन्हा एकदा 2022पर्यंत पुढे ढकलला गेला होता आणि आता पुन्हा एकदा दौरा रद्द झाल्याने त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt syndrome) म्हणजे काय?
रामसे हंट सिंड्रोम (RHS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर पुरळ येतात, जे वेदनादायक असतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायूही होऊ शकतो. यामुळे बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते. जेव्हा, व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो, तेव्हा हा दुर्मिळ आजार होतो.
संबंधित बातम्या