एक्स्प्लोर

Jhimma Marathi Movie : 'झिम्मा'ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी; प्रेक्षकांची जिंकली मनं

Jhimma Marathi Movie : 'झिम्मा' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 ला प्रदर्शित झाला.

Jhimma Marathi Movie : लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' (Jhimma) हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवूडचेही अनेक सिनेमे असताना देखील
‘झिम्मा' ने आपली घोडदौड कायम ठेवली. गेले अडीच महिने 91 टक्के प्रेक्षकांची पसंती मिळवत महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट असल्याचा मान 'झिम्मा'ने पटकावला आहे. आजही अनेक सिनेमे प्रदर्शित होत असताना ‘झिम्मा'ने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सोशल मिडीयावरही 'झिम्मा'च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे आणि आता बघता बघता या चित्रपटाने सिनेमागृहात  75 दिवस साजरे केले आहेत.
    
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' 19 नोव्हेंबर 2021 ला प्रदर्शित झाला.  एका दिवशी एकाच चित्रपटगृहात सलग अठरा खेळ हाऊसफुल्ल करण्याचा अनोखा विक्रम या चित्रपटाने केला. प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकणारा हा आशयघन चित्रपट तिसऱ्या आठवड्यात आधीपेक्षा जास्त शोज मिळवून सुपरडुपर हिट ठरला. जगभरात 60 पेक्षा जास्त शहरांमध्ये प्रदर्शित झाला. झिम्माने आपल्या 50 व्या दिवशी महाराष्ट्रात ९० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये राहुन आपला गौरवशाली 50 दिवस साजरा करण्याचा रेकॉर्ड बनवला. कोविड काळात पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून 14. 50 कोटीची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आजही सिनेमागृहात प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरीही चित्रपटगृहात जाऊन 'झिम्मा' पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे. ॲमेझॉन प्राईम इंडियावर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये झळकण्याचा बहुमान पटकावला आहे.

महाराष्ट्रातल्या महिलांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. अनेकींनी 'झिम्मा' पासुन प्रेरित होऊन सहलींचे आयोजनही केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सहलींचे फोटोज ‘झिम्मा'च्या टीमपर्यंत पोहोचवले. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे आज झिम्माने अमृतोत्सवापर्यंत मजल मारली. इतकेच नाही तर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहांची दारेही पुन्हा उघडली. सलग 11 आठवडे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा चित्रपट आता केवळ चित्रपट राहिला नसून तो आता एक सोहळा झाला आहे.

'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाच्या लेखनाची धुरा इरावती कर्णिक यांनी सांभाळली असून संगीत अमितराज यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'झिम्मा' च्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, 'झिम्मा'ला प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम पाहून माझ्या मनात आज अनेक भावना आहेत. 'झिम्मा' प्रेक्षकांसाठी जशी रोलरकोस्टर राईड होती, तशी अनेक कारणांमुळे ती माझ्यासाठीही होती. मागील दोन वर्षांत अनेक वेळा प्रदर्शनाच्या तारखा बदलाव्या लागल्या होत्या, अनेक अडचणी आल्या तरीही बऱ्याच प्रतिक्षेनंतर सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून पंचाहत्तर दिवसांचा हा यशस्वी प्रवास तमाम प्रेक्षकांमुळेच शक्य झाला असे मी म्हणेन. रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. झिम्मा पार्ट 2 येणार का? या प्रश्नाला मात्र त्यांनी हसरा चेहरा ठेवत काहीही बोलण्याचं टाळलंय. त्यामुळे झिम्मा 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार का यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Pushpa : The Rise : अनेक आव्हानं, कठिण अडचणी; अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर 'पुष्पा'ची पडद्यामागील गोष्ट

Nia Sharma : 'पैशांसाठी कराव्या लागतात विणवण्या'; नियानं सांगितला स्ट्रगलचा अनुभव

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget