'जीव झाला बाजिंद' गावाकडची भन्नाट प्रेमकथा सांगणारं मराठमोळं गाणं प्रदर्शित, मिळतेय चांगलीच पसंती
सध्या वेगवेगळी गीतं व्हायरल होत आहेत. यात प्रेमगीतांना खास पसंती मिळते. असंच एक खास ग्रामीण बाजातील गाणं मराठी originals या You Tube channel वर प्रदर्शित झालं आहे.
मुंबई : सध्या वेगवेगळी गीतं व्हायरल होत आहेत. यात प्रेमगीतांना खास पसंती मिळते. असंच एक खास ग्रामीण बाजातील गाणं मराठी originals या You Tube channel वर प्रदर्शित झालं आहे. 'जीव झाला बाजिंद' हे गावाकडची भन्नाट प्रेमकथा सांगणार गाणं प्रदर्शित झालं आहे. बार्शीचे कलाकार असणारे शुभम गोणेकर यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे तर अभिनेते विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल यांनी यात अभिनय केला आहे. ग्रामीण प्रेमकथा असलेलं हे गाणं चांगलंच पसंतीस उतरलं आहे.
गावाकडची प्रेम कथा सांगणारं हे गाणं आहे. या गाण्यामध्ये आपल्याला एक वेगळा अनुभव नक्कीच अनुभवयला मिळणार आहे. कारण नेहमी पेक्षा एक वेगळ्या धाटणीचं, गावरान बाज असलेलं हे गाणं आहे. या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिलेले असून मयूर सुकाळे यांनी गायले आहे. तर संगीत संकेत शिर्के यांनी दिले आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे. या गाण्यामध्ये एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे.
विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल असा विश्वास गाण्याचे दिग्दर्शक शुभम गोणेकर यांनी व्यक्त केला आहे.या गाण्यात आम्ही कोणतीही कसूर ठेवलेली नाही. प्रत्येकाने अगदी मनापासून आणि प्रामाणिक पणे एक चांगली कलाकृती करण्याचा प्रयत्न केला आहे, असं ते म्हणाले.
एकूणच गावाकडचे वातावरण, दोघांची केमिस्ट्री गाण्याचा आवाज संगीत आणि शब्द या सगळयाने तुम्हा सर्वांचा जीव बाजिंद होणार असा विश्वास अभिनेते विठ्ठल काळे यांनी व्यक्त केला आहे. हे गाणं प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला नक्की आवडेल, असंही ते म्हणाले.